Mogara facepack: आरोग्यासोबतच आपली त्वचा आणि चेहराही चमकावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. विशेषत: मुली आपल्या चेहऱ्यावर गुलाबी चमक आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत बाजारात विविध प्रकारची उत्पादने मिळतील पण त्यांचे दुष्परिणामही कमी नाहीत. अशा परिस्थितीत नैसर्गिक आणि हर्बल उत्पादनांपासून बनवलेल्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुंदर आणि चमकदार त्वचा मिळावी असं प्रत्येकालाच वाटतं. चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी महिला कोणत्याही समारंभापूर्वी फेशिअल करून घेतात. पण अनेकवेळा अचानक एखादा समारंभ किंवा पार्टी असेल तर काय करायचं असा प्रश्न बऱ्याच जणींना पडतो. अशा वेळी घरीच काय करता येईल असा तुम्ही विचार करत असाल तर मोगऱ्याचा फेसपॅक नक्की ट्राय करा. तुम्ही केसात भरपूर मोगरा माळला असेल. पण या सुगंधित फुलाचा मोगऱ्याचा फेसपॅक कसा बनवायचा आणि चेहऱ्यावर लावण्याची पद्धत काय ते आज जाणून घ्या.

मोगरा फेसपॅक साहित्य

आपल्याला मोगऱ्याचा फेसपॅक बनवण्यासाठी मोगऱ्याची फुलं, कच्चं दूध आणि बेसन लागणार आहे.

मोगरा फेसपॅक कसा बनवायचा

  • आता हे बनवायचं कसं, तर सर्वात आधी मोगऱ्याची फुले घेऊन बारीक करा.
  • एका भांड्यात घाला आणि त्यात एक चमचा कच्चे दूध आणि बेसन मिसळा.
  • जर पेस्ट घट्ट असेल तर आपण थोडे अधिक दूध घालू शकता. हा फेसपॅक तुम्हाला चेहऱ्यावर २० मिनिटे ग्लोसाठी ठेवावा लागेल.
  • यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावून १० ते १५ मिनिटांनी थंड पाण्यानं धुवा.

हेही वाचा >> सावधान! फणस खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

मोगऱ्याला खूप छान सुगंध असतो. त्यामुळे सुगंधी उत्पादनांमध्ये मोगऱ्याचा भरपूर वापर केला जातो. मोगऱ्याच्या फुलाची पेस्ट त्वचेवर लावल्यानं त्वचा नितळ आणि मऊ होते. विशेषत: थंडीमध्ये त्वचेसाठी हा फेसपॅक अधिक फायदेशीर आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mogra facepack to enhance your skin instant glow homemade face packs srk
Show comments