अनेकांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर आपल्याला खूप तीळ दिसून येतात. चेहऱ्याचे तीळ काही वेळा सौंदर्य वाढवण्याचे काम करतात, तर काही वेळा चेहऱ्यावर नको तिथे तीळ असतील ते सौंदर्य बिघडवतात. पण, चेहऱ्यावर हे तीळ कशामुळे येतात याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे खालील लेखात आपण चेहऱ्यावर तीळ कशामुळे येतात जाणून घेणार आहोत….
चेहऱ्यावर तीळ येण्यामागची कारणे
अनेकांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जे तीळ तयार होतात ते शरीराच्या पेशींपासूनच बनतात. त्याच्या मागे दुसरे कोणतेही कारण नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराचे तीळ का असतात? तर यामागचे कारण म्हणजे, तीळ हे शरीराचा रंग आणि पेशींशी संबंधित आहे. शरीराचा रंग आणि पेशींनुसार एखाद्या व्यक्तीच्या शरीरात वेगवेगळ्या स्वरूपात तीळ दिसतात. वैज्ञानिक भाषेत बोलायचे झाल्यास, शरीरावरील तीळ मेलेनोसाइट्सचे प्रमाण मानले जाते. मेलेनोसाइट्स एक प्रकारच्या पेशी आहेत, ज्या आपल्या त्वचेचा रंग ठरवतात. जेव्हा मेलेनोसाइट्स पेशी शरीराच्या इतर भागांमध्ये व्यवस्थितरित्या पसरत नाही आणि एका ठिकाणी येऊन जमा होतात, तेव्हा त्या तिळाच्या रूपात दिसू शकतात.
किचन ट्रॉली खूप घाण होऊन गंजली आहे? मग साफ करण्यासाठी वापरा ‘या’ ४ सोप्या ट्रिक्स
शरीरावर तीळ येण्याच्या इतर कारणांबद्दल बोलायचे झाले, तर सूर्यप्रकाशाच्या संपर्कात सतत येण्यामुळेही बहुतेक लोकांच्या शरीरावर तीळ येऊ शकतात. अतिनील किरणे मेलेनोसाइट्सच्या निर्मितीमागे उत्प्रेरक म्हणून काम करतात. त्याच वेळी, या किरणांमुळे चेहरा आणि शरीरावर तीळ होऊ शकतात.
शरीरातील हार्मोनल बदलांमुळे काही लोकांच्या शरीरावर तीळ येऊ शकतात. बहुतेक लोकांच्या शरीरात युवावस्था आणि गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदल होऊ शकतात.