जर तुमच्या कमाईत एक चांगला कमाई असणारा व्यवसाय शोधत असाल आमच्याकडे तुमच्यासाठी एक कल्पना आहे. हा व्यवसाय कमी खर्चात सुरू करता येईलच पण त्याच बरोबर तुमच्या घरातूनच सुरू करू शकता. आम्ही टिकली बनवण्याचा व्यवसायाबाबत सांगत आहोत जो तुम्ही केवळ घरामध्ये छोटी मशीनचा वापर करून सुरू करू शकता. त्यामुळे तुम्हाला मोठ्या मोठ्या ठिकाणी जसे की ऑफिस किंवा फॅक्ट्रीची गरज पडू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राचीन काळापासून टिकली विवाहित महिलांची ओळख आहे आणि आजच्या काळातही महिलांसह मुली देखील टिकली वापरतात. भारतीय परंपरेनुसार, टिकली हा १६ श्रृंगारपैकी एक असून सर्वात महत्त्वाचा मानला जातो. काही काळापूर्वी बाजारात फक्त गोल टिकल्यांची मागणी होती. आता कित्येक आकाराच्या टिकल्या आणि डिझाईन्सच्या टिकल्यांचा वापर महिला करतात. टिकली बनवणे नेहमी चालणारा व्यवसाय आहे आणि त्याची मागणी शहरांपासून गावांपर्यंत प्रत्येक ठिकाणी होत आहे.

खूप मोठे आहे टिकल्यांचे मार्केट
टिकल्यांचा मार्केट पूर्वीपेक्षा जास्त मोठा झाला आहे. आकडेवारीनुसार, एक महिला वर्षभरात साधारण १२ ते १४ टिकल्यांचे पॅकेट वापरते. हे पाहता या क्षेत्रात तुम्ही तुमचे पाऊल टाकू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी फक्त १० हजार रुपयांपासून सुरू करता येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला कच्चा माल म्हणून मलमलचे कापड, चिटकवण्यासाठी गम, डिंक, क्रिस्टल, मोती सारखे सामनाची आवश्यकता पडेल. जे मार्केटमध्ये खूप सहज उपलब्ध होऊ शकते.

हेही वाचा – महागडे स्क्रब खरेदी करण्याची गरज नाही, आता घरीच बनवू शकता Homemade Scrub, कसे ते जाणून घ्या

असा सुरू करा टिकल्या बनवण्याचा व्यवसाय

टिकली तयार करण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे टिकली प्रिटिंग मशीन, टिकली कटर मशीन, गमींग मशीन इत्यादी असले पाहिजे. त्याचबरोबर मोटर आणि हँड टूल्सची देखील आवश्यकता पडू शकते. या व्यवसायाची सुरूवातीच्या काळात तुम्ही मॅन्युअल मशीन वापरू शकता. त्यानंतर हा बिझनेस वाढवण्यासाठी तुम्ही ऑटोमॅटिक मशीन देखील घेऊ शकता.

हेही वाचा – पावसाळ्यात बिस्कटे आणि स्नॅक्स मऊ पडतायेत का? नेहमी ताजे-कुरकरीत राहण्यासाठी ‘या’ टिप्स वापरा

या व्यवसायामध्ये किती मिळेल उत्पन्न
टिकलीचा व्यवसायाची कमाई करण्याचा प्रश्न असेल तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त बचक होऊ शकते. जर तुम्ही तुमचे प्रॉडक्ट विक्री चांगल्या पद्धतीने होऊ शकते त्यामुळे तुम्ही दर महिन्याला ५० हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकता. या बिझनेसमध्ये मार्केटिंग क्षेत्र सर्वात महत्त्वाचे आहे. आपले प्रॉडक्ट तुम्हाला गााव किंवा शहरात कॉस्मेटिकच्या दुकानात लोकल मार्केट आणि जनरल स्टोअरमध्ये विकू शकता. त्यासाठी तुम्ही हा मॉल, सुपर मार्केट, मंदीराच्या आसपासच्या दुकानांमध्ये पुरवठा करून चांगली कमाई करू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money making tips small bindi or tikili business idea how to earn from business snk
Show comments