जगभरात मंकीपॉक्सचा धोका वाढतोय, तब्बल ७५ हुन अधिक देशात या आजाराचा प्रसार झाला आहे. भारतात सुद्धा आज (३ ऑगस्ट) पर्यंत मंकीपॉक्सचे ८ रुग्ण समोर आले आहेत यातील ५ रुग्ण केरळ मधील तर ३ दिल्ली मधील आहेत. भारतात आतापर्यंत मंकीपॉक्समुळे एका मृत्यूची नोंद झाली आहे. सद्य परिस्थिती पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. मंकीपॉक्सच्या धोक्यापासून वाचण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याबाबत खाली दिलेले नियम प्रत्येकाने पाळावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मंकीपॉक्स पासून वाचण्यासाठी हे करा

मंकीपॉक्स पासून बचावासाठी शारीरिक अंतर राखणे हा सोपा मार्ग आहे. संभाव्य रुग्णांपासून किंवा ज्यांच्यात मंकीपॉक्सची लक्षणे दिसून येत आहेत त्यांच्यापासून दूर रहा. जर तुम्हाला तुमच्यात अशी लक्षणे दिसून आली तर तात्काळ तपासणी करून घ्या. सुरुवातीच्या टप्प्यात माहिती मिळाल्यास उपचार करून या आजारावर मात करता येते. ज्याप्रमाणे आपण कोरोना काळात साबण व सॅनिटायजर वापरण्याची सवय लावली होती त्याचे पालन करा. सध्या मास्कचा वापर करण्याबाबतची बंधने हटवण्यात आली आहेत मात्र स्वतःच्या सुरक्षेसाठी मास्क व हॅन्ड ग्लोव्ह्ज वापरा. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी ताजी फळे आणि भाज्या खा.रोज हळदीचे दूध प्या.

मंकीपॉक्स पासून वाचण्यासाठी हे टाळा

मंकीपॉक्स पासून वाचण्यासाठी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींसोबत बेड व वस्तू शेअर न करण्याचा सल्ला दिला जातो. यासोबतच अशा व्यक्तींसह लैंगिक संबंध ठेवणे टाळा. मंकीपॉक्सचा अधिक संसर्ग हा लैंगिक संक्रमणातून होत असल्याचे समोर आल्याने यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनेने सुद्धा सेक्स कमी करण्याचा सल्ला दिला होता. मंकीपॉक्स संदर्भातील माहितीसाठी अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवा, याबाबतचे अपडेट आरोग्य मंत्रालयाच्या वतीने वारंवार जारी केले जातात त्यावर लक्ष ठेवा. अफवांवर विश्वास ठेवू नका.

आरोग्य मंत्रालयाचे ट्विट

दरम्यान मंकीपॉक्स यापूर्वी सुद्धा अस्तित्वात होता. १९७० साली एका ७ वर्षीय मुलाला याची लागण झाल्याचे समोर आले होते. याचा सर्वाधिक धोका गर्भवती महिला व लहान मुलांना असल्याने त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य संघटनेमार्फत करण्यात येत आहे.