Monkeypox Virus In Semen: मंकीपॉक्सच्या रुपाने संपूर्ण जगावर पुन्हा एकदा संकटाचे सावट पसरले आहे. तब्बल ७५ हुन अधिक देशात या आजाराचा प्रसार झाला आहे. हा गंभीर आजार मुख्यतः लैंगिक संबंधातून पसरणारा आहे याबाबत मागील काही काळात अनेक चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने पुरुषांना कमी पार्टनर्स सोबत सेक्स करण्याचा सल्ला सुद्धा दिला होता. नुकत्याच समोर आलेल्या लॅन्सेट जर्नल मधील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, मंकीपॉक्समधून बरे झाल्यानंतरही हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या विर्यामध्ये (Semen) अनेक आठवडे राहतो.

प्राप्त माहितीनुसार,मे महिन्यात मंकीपॉक्सचा उद्रेक झाल्यापासून समोर आलेल्या प्रकरणांपैकी ९८ टक्के प्रकरणांमध्ये समलिंगी, उभयलिंगी आणि पुरुषांसोबत संबंध ठेवणाऱ्या पुरुषांचा समावेश आहे. अंगावरील पुरळ, शरीरावरील स्त्राव, खोकताना आणि शिंकताना तोंडातून बाहेर पडलेले थेंब यामुळे मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ शकतो.

पहा ट्विट

इटलीस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इन्फेक्शियस डिसीजच्या व्हायरोलॉजी लॅबमधील संशोधक आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक फ्रान्सिस्का कोलाविटा, सांगतात की, मंकीपॉक्स इतर गोष्टींमधून पसरण्याची शक्यता आहे, परंतु हा लैंगिक संक्रमित रोग आहे की नाही याचा तपास केला जात आहे. तसेच या आजारातून बरे झाल्यानंतर अनेक आठवडे संक्रमित व्यक्तीच्या वीर्यमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा डीएनए राहतो.

Monkeypox: मंकीपॉक्सचा धोका वाढतोय! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले ‘हे’ Do’s & Don’ts

दरम्यान, चेहरा व शरीरावर पुरळ, डोकेदुखी, स्नायुदुखी, थकवा, ताप हे मंकीपॉक्सचे साधारण लक्षण आहे. सध्या मंकीपॉक्सवर कोणताही इलाज नाही. मात्र स्मॉलपॉक्स लसीकरणामुळे विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळा असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

Story img Loader