Monsoon Curly Hair Care : कुरळे केस सांभाळणे म्हणजे खूपच आव्हानात्मक काम असते. विशेषत: पावसाळ्यात कुरळे केस खूप जास्त कोरडे व राठ होतात. त्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे केसातील कोरडेपणा आणखी वाढतो. जर तुम्हीही या समस्येपासून ग्रासले असाल, तर आज तुम्हाला अशा एका तेलाचा जुना नैसर्गिक उपाय सांगणार आहोत; ज्याच्या मदतीने तुम्ही केसांची योग्य पद्धतीने काळजी घेऊ शकता. या उपायासाठी जे तेल वापरणार आहोत ते म्हणजे एरंडेल तेल.

एरंडेल तेल पावसाळ्यात कुरळ्या केसांसाठी ‘गेम चेंजर’ म्हणून काम करते. हे तेल केसांना पोषण देऊन ते मऊ, चमकदार व निरोगी ठेवण्यास मदत करते.

How does Set dosa differ from Benne dosa (1)
सेट डोसा हा बेन्ने डोसापेक्षा वेगळा कसा आहे? कोणता डोसा आहे आरोग्यदायी? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Neena Gupta says she was not allowed to carry homemade dhaniya powder
Why Spices Are Not Allowed On Flights: घरी बनवलेले मसाले विमान प्रवासात घेऊन जाऊ शकतो का? वाचा, नीना गुप्ता यांचा अनुभव आणि तज्ज्ञांचे मत…
Kartik Aaryan
डिओड्रंटचा वापर करून ‘या’ अभिनेत्याने जाळले होते बहिणीचे केस; आईनेच केला खुलासा
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी

कुरळ्या केसांवर एरंडेल तेलाचा असा करा वापर

एरंडेल तेल असे एक नैसर्गिक तेल आहे; जे अ व ई या जीवनसत्त्वांनी, तसेच फॅटी अॅसिडने समृद्ध आहे. हे पोषक घटक केसांना हायड्रेट, तसेच पोषण करण्यास मदत करतात; ज्यामुळे केस तुटण्याची शक्यता कमी होते. एरंडेल तेलाचा तुरट गुणधर्म केसांच्या मुळांचे संरक्षण करतात ज्यामुळे ओलावा कमी होण्यास मदत होते, अशी माहिती बेंगळुरूस्थित त्वचारोग तज्ज्ञ डॉ. श्रव्या सी. टिपिरनेनी यांनी IndiaToday.in शी बोलताना दिली.

प्रत्येक केसाच्या मुळाभोवती संरक्षणात्मक अडथळा निर्माण करून, ओलावा आणि हायड्रेशन टिकवण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर करणे फायदेशीर मानले जाते. विशेषतः हे कुरळ्या केसांसाठी उपयुक्त ठरते. याच विषयावर बॉडी शॉप इंडियाच्या लर्निंग अकॅडमीचे डीजीएम रजत माथूर म्हणाले की, रिसिनोलिक अॅसिड, एक मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, एरंडेल तेल टाळूसाठी उत्कृष्ट पोषण आणि मॉइश्चरायझिंग एजंट म्हणून काम करते. त्यामुळे एरंडेल तेल केसांच्या वाढीसाठी चांगली परिस्थिती निर्माण करून टाळूला निरोगी बनवते.

एरंडेल तेलाचा कुरळ्या केसांवर असा करावा वापर

१) अशा अनेक पद्धती आहेत; ज्यामध्ये तुम्ही तुमच्या हेअरकेअर रूटीनमध्ये एरंडेल तेलाचा समावेश करू शकता. सुरुवातीला तुम्ही त्यात थोडे ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेल मिसळून केसांना लावू शकता. डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट म्हणून तुम्ही एरंडेल तेल तुमच्या केसांना रात्रभर लावू शकता.

२) पावसाळ्यात कुरळ्या केसांना सुरक्षित ठेवण्यासाठी घराबाहेर जाण्यापूर्वी थोडेसे एरंडेल तेल केसांना लावू शकता.

३) एरंडेल तेल मुळातच थोडे चिकट असल्यामुळे त्याचा थेट वापर करणे अनेकदा अडचणीचे बनते. कारण- त्यामुळे केसांतील चिकटपणा पटकन निघत नाही.

४) अशा वेळी तुम्ही एरंडेल तेलापासून बनवलेले हेअरकेअर प्रॉडक्ट्स वापरू शकता. बॉडी शॉपची जमैकन ब्लॅक कॅस्टर ऑइल रेंज यामुळे टाळू स्वच्छ होते आणि केसही मॉइश्चरायझ होतात. त्याशिवाय केसांच्या निरोगी वाढीस प्रोत्साहन मिळते.

५) केसांना मजबूत करून, ते तुटू नयेत यासाठी एरंडेल तेल फायदेशीर मानले जाते. केसांना अधिक लवचिक बनविण्यासाठीही हे तेल उपयुक्त आहे.

पावसाळ्यात कुरळ्या केसांची काळजी घेण्यासाठी टिप्स

डॉ. श्रव्या सी. टिपिरनेनी यांनी दिलेल्या काही टिप्सनुसार, कुरळे केस जास्त वेळा धुणे टाळा. केसांना फाटे फुटले असतील, तर ते काढून टाकण्यासाठी ते नियमित ट्रिम करा. त्याशिवाय कुरळ्या केसांचे सूर्यकिरण आणि वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी टोपी किंवा स्कार्फचा वापर करा.