पावसाळा सुरू झाल्यावर आजारांचा धोका वाढतो. या ऋतूत निरोगी राहण्यासाठी जीवनशैलीत आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. या ऋतूमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळेच खाण्यापिण्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. या ऋतूत स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी कोणता आहार घ्यावा, तसेच हंगामी आजार टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल माहिती जाणून घेऊया.
पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. या ऋतूमध्ये शिंका येणे, खोकला, जुलाब आणि पोटात संसर्गाची प्रकरणे सर्वाधिक आढळतात. काहींना तापही येतो. हे टाळण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त आहार घ्यावा. अधिकाधिक पाणी प्यावे आणि स्वतःला हायड्रेट ठेवावे. यासाठी आवळा, लिंबूपाणी, नारळपाणी आणि कोरफडीचा रस घ्यावा.
Photos : मुलींना आईकडून वारशामध्ये मिळते Anxiety; संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती
या ऋतूत स्वच्छतेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. फळे आणि भाज्या वापरण्यापूर्वी, कोमट पाण्यात मीठ घालून स्वच्छ करा. तीन तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेले अन्न खाऊ नये. केळी, पपई, ताजा रस यांचे सेवन येईल. रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि पॅकबंद वस्तू खाणे टाळा, तसेच हात वारंवार चांगले धुवा.
न्याहारीमध्ये तृणधान्ये, डाळ, दही, मुगाच्या डाळीचे थालीपीठ किंवा फ्रूट चाट यांचा समावेश करू शकता. नाश्त्यात तेलकट खाणे टाळावे. दुपारच्या जेवणात चपाती, मसूर, भाज्या, दही, कोशिंबीर घ्या. फायबर, प्रथिने, पोषक तत्वे, कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्त्वे असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. रात्रीच्या जेवणात नेहमी हलक्या आणि सहज पचणाऱ्या गोष्टी खाव्यात. रात्रीच्या जेवणात तुम्ही खिचडी, डाळ आणि दही खाऊ शकता.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)