Monsoon Footwear Shoe Bite Remedies: पावसाळ्यात प्रवासाच्या वेळी आपल्या इतर सीझनच्या चप्पला कितीही ब्रँडेड असल्या तरी घसरून पडण्याची भीती असते. अशावेळी साध्यासरळ प्लास्टिकने बनवलेल्या मान्सून चप्पला तुमचा त्रास वाचवू शकतात. फॅशन प्रेमी मंडळींमुळे या मान्सून चप्पलांच्या सुद्धा भन्नाट डिझाइन्स मार्केटमध्ये आलेल्या आहेत. पण बहुतांश लोकांना या चप्पला वापरणे ही त्रासदायक ठरते याचे मुख्य कारण म्हणजे शू बाईट. जर प्लॅस्टिक चप्पलच्या कडा नीट मोल्ड केलेल्या नसतील तर पायाच्या मागील बाजूला घर्षण झाल्याने जखमा होऊ शकतात. अशात तुम्ही पावसाच्या पाण्यात फिरत असाल तर जखम आणखीनच चिघळण्याची सुद्धा शक्यता असते. शिवाय इन्फेक्शनचा धोका असतो तो वेगळाच! काही जण तर म्हणून अशा चप्पला नव्या कोऱ्या असतानाच फेकून देतात. मात्र असे पैसे वाया घालवण्यापेक्षा या सगळ्यावर उपाय म्हणून तुम्हाला काय करता येईल हे आपण पाहूया…

१) एरवी अशी जखम झाल्यास ती उघडी ठेवून सुकू द्यावी असे अनेकजण सांगतात पण पावसाळ्यात अशी जोखीम पत्करणे धोक्याचे ठरते. जखमेला पाण्याचा अधिक स्पर्श होऊ नये यासाठी आधी कोरड्या कपड्याने किंवा माउस कापसाने जखम व आसपासचा भाग पुसून काढा व त्यावर एखादी अँटी बॅक्टरीयल क्रीम व बँडेज लावा. तुम्ही नव्या चप्पल घेत असल्यास अगोदर पायाच्या अंगठ्याच्या व करंगळीच्या शेजारी व मागील बाजूस बँडेज लावणे उत्तम ठरेल.

mother expressed grief, child orphanage,
आई म्हणून मीच एकटी दोषी का रे!
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
How To Manage Cold Naturally Without Medication Home Remedy For Cold And Cough
हवा बदल झाल्याने सर्दी-कफाने बेजार? पाच सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम, वाटेल फ्रेश
Stop Throwing Out Banana Strings
Stop Throwing Out Banana Strings : केळे खा; पण स्ट्रिंग्स काढून फेकू नका; ‘या’ तीन आरोग्य समस्यांसाठी ठरतील फायदेशीर; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
kachya papayachi sukhi bhaji recipe in marathi bhaji recipe
कच्ची पपई खाल्याने आरोग्याला होतील चमत्कारी फायदे; कच्च्या पपईची भाजी गृहिणींनो एकदा नक्की ट्राय करा
environment protection from debris
फेनम स्टोरी: भंगारातून पर्यावरण रक्षण
digital arrest, savings account leasing, savings account,
आपले बचत खाते भाड्याने देणे
Fasting On Navratri? These Tips Will Make Sure Your Nine Days Are A Breeze Diet Tips Ashadhi Ekadashi Upwas Fasting
Navratri 2024: नवरात्रीत ९ दिवस उपवास करताय? खा हे पदार्थ, दिवसभर राहाल एनर्जेटिक

२) अनेकदा फोड येतानाच त्यात पाणी गेलेले असते, अनेकांना असे फोड फोडण्याची सवय असते मात्र असे केल्याने संसर्ग वाढू शकतो त्यामुळे जखम चिघळण्याचा प्रयत्न करू नका.

३) तुम्ही काही बर्फाचे तुकडे एका स्वच्छ कपड्यात गुंडाळू शकता आणि शू बाईट झालेल्या भागात लावू शकता. याशिवाय पायाला आलेली सूज दूर करण्यासाठी देखील हा उपाय उत्तम आहे.

४) तुम्ही रोज दात घासण्यासाठी वापरता तीच टूथपेस्ट तुम्हाला शू बाईटपासून सुद्धा आराम देऊ शकते. थोडी पेस्ट बोटावर घेऊन शू बाईट झालेल्या भागात लावा थोड्यावेळाने ओल्या .

५) तुम्ही व्हॅसलिनसारखीच एखादी पेट्रोलियम जेली सुद्धा वापरू शकता.

६) अलीकडे पॅंटी लायनर्स म्हणून एक प्रकार चर्चेत आहे. डायपर किंवा सॅनिटरी पॅड सारखाच पण लहान आकाराचा हा लायनर तुम्ही चप्पलांच्या मागील बाजूस वापरू शकता.

हे ही वाचा<< बेसिन- मोरीतून गांडूळ बाहेर येतायत? पावसाळा सुरु होतोय, अगदी स्वस्तात करा ‘हे’ जुगाडू उपाय

दरम्यान, नव्या चप्पला विकत घेतानाच त्या योग्य साईजमध्ये घ्या. काहींना आपल्या पायाच्या आकारापेक्षा मोठ्या चप्पला वापरायची सवय असते पण यामुळे पाय व चप्पलमध्ये जास्त जागा राहून घर्षण अधिक होण्याचा धोका असतो यापेक्षा योग्य मापाची चप्पल घेणे कधीही उत्तम.