Monsoon Footwear Shoe Bite Remedies: पावसाळ्यात प्रवासाच्या वेळी आपल्या इतर सीझनच्या चप्पला कितीही ब्रँडेड असल्या तरी घसरून पडण्याची भीती असते. अशावेळी साध्यासरळ प्लास्टिकने बनवलेल्या मान्सून चप्पला तुमचा त्रास वाचवू शकतात. फॅशन प्रेमी मंडळींमुळे या मान्सून चप्पलांच्या सुद्धा भन्नाट डिझाइन्स मार्केटमध्ये आलेल्या आहेत. पण बहुतांश लोकांना या चप्पला वापरणे ही त्रासदायक ठरते याचे मुख्य कारण म्हणजे शू बाईट. जर प्लॅस्टिक चप्पलच्या कडा नीट मोल्ड केलेल्या नसतील तर पायाच्या मागील बाजूला घर्षण झाल्याने जखमा होऊ शकतात. अशात तुम्ही पावसाच्या पाण्यात फिरत असाल तर जखम आणखीनच चिघळण्याची सुद्धा शक्यता असते. शिवाय इन्फेक्शनचा धोका असतो तो वेगळाच! काही जण तर म्हणून अशा चप्पला नव्या कोऱ्या असतानाच फेकून देतात. मात्र असे पैसे वाया घालवण्यापेक्षा या सगळ्यावर उपाय म्हणून तुम्हाला काय करता येईल हे आपण पाहूया…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा