अतिसार हा अॅलर्जी, फूड पॉयझनिंग किंवा क्रॉनिक कंडिशनमध्ये होत असला तरीही ते तुमच्या आहाराशी संबंधित असते. अतिसार हा पचनसंस्थेशी संबंधित विकार आहे. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. कारण या ऋतूमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झालेली असते. अतिसाराचे मुख्य कारण व्हायरल किंवा बॅक्टेरियाचे संक्रमण आहे. याच्या लक्षणांमध्ये मळमळ, ओटीपोटात दुखणे, सैल हालचाल, फुगणे, निर्जलीकरण, ताप, विष्ठेमध्ये रक्त इत्यादींचा समावेश होतो. अशा परिस्थितीत अतिसारामध्ये शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे.
अतिसार होत असताना आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते. जुलाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही वेगळ्या आहार योजना असायला हव्यात आणि काही गोष्टी टाळायला हव्यात. आज आपण जाणून घेऊया, डायरिया होत असताना काय खावे आणि काय खाऊ नये.
कान स्वच्छ करताना अजिबात करू नका ‘या’ चुका; अन्यथा येऊ शकतो बहिरेपणा
अतिसार झाल्यास काय खावे?
- जुलाबासाठी ‘ब्रॅट’ (BRAT) म्हणजे केळी, तांदूळ, सफरचंद आणि टोस्टचे सेवन सर्वाधिक फायदेशीर आहे.
- जुलाब झाल्यास पचण्याजोगे व घरी शिजवलेले अन्न खावे.
- अशावेळी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन कमी करावे.
- सलाड म्हणजेच कच्ची फळे आणि भाज्या खाणे टाळा.
- मसालेदार अन्न कमी खा.
- तुम्ही ओटमील, दलिया, उकडलेले बटाटे खाऊ शकता.
- भात आणि मूग डाळ यांची पातळ खिचडी खाऊ शकता.
- दह्यासारख्या प्रोबायोटिक पदार्थांचे अधिकाधिक सेवन करा.
- अधिकाधिक द्रव पदार्थ आणि भरपूर पाणी प्या.
- तुम्ही पाण्यात ओआरएस टाकून किंवा मीठ आणि साखरेचे द्रावण बनवून ते पिऊ शकता.
- तुम्ही नारळ पाणी, इलेक्ट्रोलाइट पाणी आणि स्पोर्ट्स ड्रिंक्स देखील पिऊ शकता.
Health Tips : सकाळी नाही, तर रात्री झोपण्यापूर्वी प्या गरम पाणी; मिळतील ‘हे’ चार आश्चर्यकारक फायदे
पाहा व्हिडीओ –
कोणते पदार्थ टाळावे?
दूध किंवा दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, कच्च्या भाज्या, कांदे, कॉर्न, लिंबूवर्गीय फळे, अल्कोहोल, कॉफी, सोडा, कार्बोनेटेड पेये, कृत्रिम गोड पदार्थ खाणे टाळावे.
दर ३ तासांनी शौचालयात जाणे, १०२ डिग्री फॅरेनहाइट ताप, अश्रू न येता रडायला येणे, काळी किंवा रक्त असलेली विष्ठा होणे, ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.