Monsoon Makeup: पावसाळ्यात आद्रात जास्त असता ज्यामुळे खूप घाम येतो. अशा परिस्थितीमध्ये जास्त मेकअप वापरल्यास सुंदर दिसण्याऐवजी तुमचा लूक खराब करू शकतो. . पावसाळ्यात हलका मेकअप करणे जास्त चांगले आहे आणि काही विशेष प्रकारच्या लिपस्टीक तुमच्या मेकअप किटमध्ये ठेवू शकता.आज आम्ही तुम्हाला अशा लिप्स शेड्स बाबत सांगणार आहोत ज्या वापरून तुम्ही पावसाळ्यातही तुमचा लूक चांगला दिसेल.
बेरी टोन
पावसाळ्यात बेरीच्या वेगवेगळ्या शेड्स जसे की डीप रेड, प्लम किंवा क्रॅनबेरी असे रंग निवडा. हे शेड्स जवळजवळ प्रत्येक त्वचेच्या टोनला सूट देतात आणि तुमचा लूक सुधारण्यासाठी मदत करतात.
हेही वाचा – पावसामध्ये तुमचा Smartphone सुरक्षित कसा ठेवावा? जाणून घ्या सोप्या Safety Tips
रोज पिंक
सॉफ्ट रोज पिंक शेड्स तुम्हाला सुंदर दिसण्यासोबतच तरुण दिसण्यासाठी देखील मदत करतात. ते ओठांना नॅचरल लूक देतात, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना कॅज्युअल आणि फॉर्मल लूकमध्ये वापरू शकता.
कोरल शेड
चमकदार कोरल शेड्स पावसाळ्याच्या दिवसामध्ये हटके लूक देण्यासाठी मदत करतात. या रंगामुळे तुम्ही तुमच्या वास्तविक वयापेक्षा तरुण दिसता आणि तुमचे सौंदर्य वाढवता.
न्यूड शेड्स
जर तुम्हाला गडद लिपस्टिक वापरणे आवडत नसेल तर तुम्ही न्यूड शेड्स निवडू शकता. न्यूड शेड्सही प्रत्येक आउटफिटसोबत वापरता येतात.
हेही वाचा – Kitchen Hacks: तुमचा कुकर पिवळा पडला आहे का? मग चुटकीसरशी होईल नवा! ‘असे’ करा साफ
मोव्ह शेड
गुलाबी आणि जांभळ्या रंगाची शेड असलेली लिपस्टिक ही एक दिवसभरच्या लूकसाठी योग्य पर्याय आहे. बरं, तुम्ही रात्रीच्या पार्टीसाठी किंवा लग्नासाठी या शेड्स वापरून पाहू शकता.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)