Monsoon Skin Care Tips : आपल्या शरीरात ऋतुमानानुसार अनेक बदल होत असतात. यात पावसाळ्यात जास्त आर्द्रता असल्याने त्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होत असतो. यामुळे विशेषत: पावसाळ्यात त्वचेसंबंधित अनेक आजार उद्भवतात. यात फंगल इंफेक्शनचा धोका जास्त असतो. ओलसर आणि दमट वातावरणामुळे फंगल इंफेक्शन वाढत जाते. अशावेळी संपूर्ण शरीरावर ते पसरण्याची शक्यता असते. यामुळे पावसाळ्यात फंगल इंफेक्शनची समस्या टाळण्यासाठी त्वचारोगतज्ज्ञ डॉ.आंचल पंथ यांनी ६ टिप्स दिल्या आहेत. ज्या फॉलो करून तुम्ही त्वचेची योग्य काळजी घेऊ शकता.

पावसाळ्यात फंगल इंफेक्शनचा धोका टाळण्यासाठी ६ टिप्स

१) आंघोळीनंतर शरीराचे फोल्ट होणारे अवयव नीट पुसले पाहिजेत. यामध्ये बगल, गुडघ्याचे सांधे, मान इत्यादींचा समावेश आहे. कारण शरीराच्या या भागात अडकलेल्या पाणी किंवा ओलावा फंगल इंफेक्शन वाढवण्याचे काम करते. यामळे तुम्ही कॉटन टॉवेलचा वापर केला पाहिजे जो योग्यप्रकारे शरीरावरील पाणी शोषून घेईल,

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?

२) पावसाळ्यात सैल सुती कपडे घालावे, जेणेकरुन ते लवकर सुकतील. तसेच ज्यांना फंगल इंफेक्शनचा त्रास आहे त्यांनी पावसाळ्यात डेनिमचे कपडे घालणे टाळावे.

३) व्यायाम केल्यानंतर लगेच कपडे बदलले पाहिजेत. अनेकजण जीम केल्यानंतर अंगावरच घामाचे कपडे सुकवण्याची चूक करतात. यामुळे फंगल इंफेक्शनचा धोका अधिक वाढतो. यामुळे जीमवरून आल्यानंतर लगेच कपडे बदला आणि आंघोळ करा.

४) आपल टॉवेल दररोज धुवा आणि इस्त्री करा. संक्रमणास प्रतिबंध करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे कॉटनचा टॉवेल वापरणे. कारण असा टॉवेल दररोज धुतल्यानंतर लगेच सुकतो. असे केल्यास टॉवेलवर इंफेक्शनची वाढ कमी होण्यास मदत होते.

५) दररोज अंडरवियर धुवून इस्त्री केली पाहिजे. अंडरगारमेंटमुळे फंगल इंफेक्शनचा धोका अधिक वाढतो. यामुळे ते ओलावा असलेल्या ठिकाणी सुकत घालणे टाळले पाहिजे.

६) फंगल इंफेक्शनवर स्टिरॉइड क्रीम्सचा न वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. कारण यामुळे इंफेक्शन आणखी चिघळण्याची शक्यता असते. स्टेरॉइड क्रीममुळे इंफेक्शन तात्पुरती कमी होते मात्र नंतर त्याच आणखी वाढ होते. यामुळे इंफेक्शनवर कोणतेही उपाय करण्याआधी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जेणेकरुन त्यावर कायमस्वरूपी उपाय करण्यास मदत होऊ शकेल