कडक उन्हानंतर, प्रत्येकजण थंड आणि आल्हाददायक पावसाळ्याची वाट पाहत असतो. ऋतू बदलत असताना लोकांना त्यांच्या जीवनशैलीतही काही बदल करावे लागतात. यातील एक बदल म्हणजे महिलांच्या मेकअपच्या पद्धतीत झालेला बदल. पावसाळ्यात इतर ऋतूंसारखी परिस्थिती नसते.
या ऋतूत कधी कधी वातावरण खूप दमट असते, त्यामुळे कधी घामाने भिजावे लागते, तर कधी पावसात भिजावे लागते. अशा परिस्थितीत चेहऱ्यावरचा मेकअप टिकवून ठेवणे हेही मोठे आव्हान असते. पावसाळ्यात आर्द्रतेमुळे किंवा पावसात भिजल्यामुळे मेकअप पसरून तुमचे सौंदर्य बिघडण्याची शक्यता खूप जास्त असते. अशा परिस्थितीत तुमचा चेहरा ग्रूम करण्याआधी तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे जेणेकरून तुम्ही अशा समस्या टाळू शकता.
तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण
पावसाळ्यात अनेक महिला मेकअपपासून दूर राहतात. अशा परिस्थितीत, आज आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही वॉटरप्रूफ मेकअपसारखा प्रभाव मिळेल असा मेकअप करू शकता.
- कधी-कधी तुम्हाला पावसात भिजावे लागते, त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा मेकअप खराब होण्याची पूर्ण शक्यता असते. अशा परिस्थितीत चेहऱ्यावर फाउंडेशन वापरणे शक्यतो टाळावे. त्याऐवजी तुम्ही कोणतीही फेस पावडर वापरू शकता. फेस पावडर वापरताना, त्याचे प्रमाण आवश्यक तेवढेच ठेवावे याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
- ब्लशिंगसाठी, पावडरऐवजी क्रीम ब्लशर वापरणे चांगले. त्याचा वापरही जपून करावा.
- याशिवाय जेव्हाही तुम्ही पावसात भिजता तेव्हा पूर्ण चेहरा रुमालाने जोरात पुसण्याऐवजी हलकेच पुसावा.
- आयशॅडोसाठी हलके रंग वापरणे चांगले. यासाठी पावडरऐवजी क्रीम वापरा जेणेकरून ओले झाल्यावर ते पसरून चेहऱ्यावर येणार नाही.
- पावसाळ्यात मेकअप करताना मस्करा टाळावा. याशिवाय पेन्सिल लाइनर आणि त्यानंतर लिक्विड आयलायनर डोळ्यांच्या मेकअपसाठी अधिक योग्य आहे. यामुळे तुम्ही पावसात भिजलात तरी ते तुमच्या चेहऱ्यावर पसरण्याचा धोका नाही.