आजकाल सगळ्यांकडेच कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. याच्या मदतीने आपण काही वेळातच आपले कपडे स्वच्छ करू शकतो. वॉशिंग मशीनमध्ये कपडे स्वच्छ करण्यासाठी आपण डिटर्जंट पावडर आणि पाण्याचा वापर करतो. मात्र, अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा वापर वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना केल्यास ते कपड्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

पावसाळ्यात कपडे धुणे, ते सुकवणे आणि त्यांना दुर्गंधीपासून दूर ठेवणे हे एक कठीण काम आहे. पावसाळ्यात हवेतील आद्रतेमुळे कपडे लवकर वाळत नाहीत. तसेच ऊन नसल्यामुळे कपड्यांमधून दुर्गंधी येण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी कपडे धुताना वॉशिंग मशीनमध्ये काही वस्तूंचा वापर केल्यास या समस्यांपासून आपली सुटका होऊ शकते.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
Maharashtra rain updates
Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता? जाणून घ्या स्वच्छ करण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स

Photos : थंड पाणी प्यायल्याने होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

  • बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरा

अनेक वेळा अस्वच्छ वॉशिंग मशीनमुळे कपड्यांना दुर्गंधी येऊ लागते. अशा परिस्थितीत वॉशिंग मशिनचे रबर आणि गॅस्केट पूर्णपणे स्वच्छ करा. त्याच वेळी, वॉशिंग मशीनचे टब स्वच्छ करण्यासाठी मशीनमध्ये पाणी भरा. त्यात तीन चमचे बेकिंग सोडा आणि अर्धा लिटर व्हिनेगर मिसळा आणि मशीन चालू करा. नंतर मशीन स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे यंत्रातील सर्व घाण साफ होईल.

  • ड्रायरमध्ये बर्फ ठेवा

वॉशिंग मशिनमध्ये कपडे वाळवल्याने कपड्यांमध्ये बरेचदा कपडे चुरतात आणि त्यांना इस्त्री करतानाही खूप त्रास होतो. अशा परिस्थितीत कपडे सुकवताना वॉशिंग मशिनच्या ड्रायरमध्ये थोडा बर्फ टाकू शकता. ड्रायरमध्ये बर्फ वितळण्याबरोबरच त्याची वाफही तयार होऊ लागते. यामुळे कपडे जास्त चुरणार नाहीत आणि तुम्ही कपडे इस्त्रीही करू शकाल.

Friendship Day 2022 : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारीच का साजरा केला जातो ‘फ्रेंडशिप डे’? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास

  • कोरडे टॉवेल वापरा

पावसाळ्यात अनेकदा कपडे लवकर सुकत नाहीत. अशावेळी आपण कोरडे टॉवेल वापरू शकतो. खरे तर कोरडा टॉवेल कपड्यांचे पाणी शोषून घेण्यात मदत करतो. त्यामुळे वॉशिंग मशिनमध्ये कपडे सुकवताना ड्रायरमध्ये कोरडा टॉवेल खाली ठेवा. यामुळे कपडे व्यवस्थित सुकतील आणि तुम्हाला कपडे सुकवण्यात कोणतीही अडचण येणार नाही.