पावसाळ्यात रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो. तसेच, हवेत आर्द्रता असते, त्यामुळे बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोकाही वाढतो. या ऋतूत त्वचेच्या अनेक प्रकारच्या अॅलर्जी होतात. जर तुमच्या त्वचेला लगेचच इन्फेक्शन होत असेल तर तुम्हाला अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात स्वच्छतेची खूप काळजी घेतली पाहिजे. नेहमी कोरडे आणि हवेशीर कपडे, शूज आणि चप्पल परिधान कराव्यात. पावसाळ्यात कोणत्या गोष्टींमुळे त्वचेची अॅलर्जी होते आणि संसर्ग कसा टाळता येईल, हे आज आपण जाणून घेऊया.
- बुरशीजन्य संसर्ग
पावसात बुरशीजन्य संसर्ग ही एक सामान्य समस्या आहे. ओलाव्यामुळे बुरशी आणि बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे त्वचेवर दाद, एथलीट फूट आणि नखांचा संसर्ग होण्याचा धोका असतो. यासाठी त्वचा धुवून स्वच्छ करा आणि त्वचा कोरडी आणि मॉइश्चराइज ठेवा. तसेच, अधिक त्रास होत असल्यास डॉक्टरांना भेटा.
Health Tips : सकाळी नाही, तर रात्री झोपण्यापूर्वी प्या गरम पाणी; मिळतील ‘हे’ चार आश्चर्यकारक फायदे
- बूट आणि कपड्यांमुळे अॅलर्जी
काही लोकांना ओलसर कपडे आणि शूजची देखील अॅलर्जी होते. त्यामुळे ओले आणि सिंथेटिक कपडे घालू नका. हे कपडे त्वचेला घासले गेल्यास अॅलर्जी आणखी वाढू शकते. त्याचबरोबर पावसात शूजऐवजी चप्पल घाला. पावसात प्लास्टिक आणि चामड्यापासून बनवलेले चप्पल घालू नका.
- घामोळ्या
पावसात आर्द्रता वाढल्याने आणि घाम येऊ लागल्याने त्वचेवर घामोळ्या येऊ लागतात. त्यामुळे स्वच्छतेची खूप काळजी घ्या. घामोळ्या आलेल्या भागावर बुरशीविरोधी उत्पादने वापरा. यावर तुम्ही कोरफडीचे जेल देखील लावू शकता. या काळात सुती आणि सैल कपडे घाला.
मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास दूर होईल ताण-तणाव; जाणून घ्या शरीराला होणारे इतर फायदे
- त्वचेवर पुरळ येणे
पावसात ओल्या कपड्यांमुळे त्वचेवर पुरळ उठतात. ज्यांना सिरोसिसचा आजार आहे त्यांना पुरळ येण्याची शक्यता जास्त असते. कधीकधी हे त्वचेचे संक्रमण टाळू आणि नखांपर्यंत देखील पोहोचते. हे टाळण्यासाठी कोरडे कपडे घाला आणि शरीर कोरडे ठेवा. पुरळ आलेल्या भागावर पावडर लावा आणि नखे कापा. केस स्वच्छ ठेवा.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)