Monsoon Travel Tips : मॉन्सूनमध्ये घराबाहेर पडणे मजेशीर असू शकते पण मुसळधार पावसामध्ये फिरायला जाणे त्रासदायक ठरू शकते. पावसाळ्यात पर्यटन स्थळांचे सौंदर्य अधिकच वाढते. पावसाच्या सरी, हिरवळ, निसर्ग सर्वकाही सुंदर असल्यासारखे भासते. कित्येक लोक या काळात फिरायला जाण्याचा प्लॅन करतात.

पावसाळ्यात फिरायला जाताना काही विशष गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. या काळात हिल स्टेशनवर जाणे टाळले पाहिजे. पावसाळ्यात डोंगराळ भागातून भूस्खलन म्हणजेच लँड स्लाईड होत असतात किंवा रस्ते बंद होतात. अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यात फिरण्यासाठी योग्य मॉन्सून ट्रॅव्हल डेस्टिनेशनची निवड करा. तसेच प्रवास करताना काळजी घ्या जेणेकरून फिरताना तुम्ही प्रवासाचा आनंद गमावणार नाही.

saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Kartik Aaryan’s Surprise Visit to Bhool Bhulaiyaa 3 Theatre Goes Viral – A Girl was Too Busy with Popcorn
कार्तिक आर्यन समोर अन् पोरगी पॉपकॉर्न खाण्यात बिझी, VIDEO पाहून म्हणाल असा अ‍ॅटिट्यूड हवा!
traffic cop warden booked for demanding bribe to remove car jammer
मोटारीचा ‘जॅमर’ काढण्यासाठी मागितली लाच; सहायक फौजदारासह, वॉर्डनवर गुन्हा
Heart Attack Prevention
Heart Attack: हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून वयाच्या विशीत अन् तिशीत ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; वाचा तज्ज्ञ काय सांगतात
youth killed in bike accident in pune
बोपदेव घाटात दुचाकी घसरुन सहप्रवासी तरुणाचा मृत्यू

पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर काही चुका तुमचा प्रवास खराब करू शकतात. आम्ही या चूकांबाबत येथे सांगितले आहे जे पावळ्यात फिरायला जाताना टाळल्या पाहिजेत.

योग्य ठिकाणाची निवड करा

पावसाळ्यात फिरायला जात असाला तर मॉन्सून प्रवासासाठी योग्य ठिकाण निवडा कोणत्या अशा ठिकाणी जाऊ नका जिथे पावसामुळे रस्ते बंद होतील आणि लँड स्लाईड होते किंवा पावसामुळे त्याठिकाणीचे पर्यटन स्थळ बंद होतात. असे न केल्यास तुमचा प्रवास खराब होईल.

हेही वाचा – Monsoon Makeup : पावसाळ्यात सुंदर दिसण्यासाठी ‘या’ लिपस्टिक शेड्स करा ट्राय! मिळेल हटके लूक

योग्य कपड्यांची निवड करा

मॉन्सूनमध्ये प्रवासा करत असाल तर योग्य कपड्यांची निवड करा. पावसाळ्यात कधीही पाऊस पडतो. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही घरातून बाहेर जात असात तर तुम्ही भिजू शकता. कपड असे परिधान करा जे पटकन सुकतील नाहीतर प्रवासात तुम्ही ओले कपड्यांमध्ये वैतागून जाऊ शकता. तसेच कपडे सुकवणे मोठी अडचण ठरू शकते. पावसाळ्यात प्रवास करताना सिंथेटिक कपडे ठेवा. यामुळे तुमचा प्रवास अधिक चांगला होईल. सिंथेटिक कपडे खूप हलके असतात. असे कपडे ओले झाल्यावर लवकर सुकतात. जे तुमचा प्रवास आरामदायी करतात.

हेही वाचा – पावसाळ्यात ट्रेकिंगचा प्लॅन करताय? ट्रेकिंग करताना काय खावे, काय टाळावे? जाणून घ्या स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट काय सांगतात

रिपेलेंट्स विसरू नका

पावसाळ्यात डास आणि इतर कीटक तुमचा प्रवास खराब करू शकतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी रिपेलेंट्स स्वत:बरोबर ठेवा. तुम्ही रोल-ऑन किंवा स्टिक-ऑन देखील घेऊ शकता. यामुळे डासांपासून संरक्षण मिळेल आणि संसर्ग टाळता येईल.

रेनकोट आणि छत्री ठेवा

पावसाळा आवडणे सोपे आहे, पण टाळणे कठीण आहे. प्रवासात रेनकोट आणि छत्री स्वत:बरोबर ठेवावी. हे तुम्हाला पावसात भिजण्यापासून वाचवेल.

हेही वाचा – पावसाळ्यात शूज-चप्पल भिजण्याचे टेंन्शन आता विसरा, सुकवण्यासाठी फक्त ‘हे’ ५ हॅक्स वापरा!

वॉटरप्रूफ बॅग

प्रवासाला जाता सामान पॅक करताना हे लक्षात ठेवा की तुमच्या सामानाची बॅग वॉटरप्रुफ असेल. कारण पावसाळ्यात तुमची बॅग पाण्यामध्ये भिजण्याची शक्यत असते त्यामुळे जर वॉटर प्रुफ बॅग असेल तर पाणी आतमध्ये जाणार नाही. प्रवासासाठी जे सामान स्वत:बरोबर ठेवणार आहात ते खराब होणे टाळता येईल.

वॉटरप्रूफ इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस ठेवा

जर तुम्ही पावसाळ्यात प्रवास करत असाल तर तुमच्याबरोबर वॉटरप्रूफ इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस ठेवा. हे तुमचा प्रवास सुरक्षित ठेवते. तुमच्या फोनचे कव्हर आणि इतर डिव्हाइसेस वॉटरप्रूफ देखील ठेवा. जेणेकरून कोणतेही नुकसान टाळता येईल. जर तुम्हाला पावसाळ्यात प्रवास आरामदायी बनवायचा असेल तर या टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. ज्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे.

हेही वाचा – पावसाळ्यात रस्त्यावर बाईक आणि स्कूटरचा प्रवास होईल सुरक्षित आणि सोपा; फक्त ‘या’ सोप्या टीप्स लक्षात ठेवा

खाण्या-पिण्याचे सामान

मॉन्सूनमध्ये अचानक प्रवास होत असेल तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला हॉटेल रुमध्ये थांबावे लागेल. बाहेर पडणे शक्य नसेल तर खाण्यापिण्याचे सामान आणणे शक्य होणार नाही. अशा वेळी तुमच्याकडे काही स्नॅक्स आणि हलके फुलके खाण्याच्या वस्तू ठेवा कित्येक हॉटेल फूड डिलिव्हरीची सुविधा देतात जी महाग असते.