Top 5 Places To Visit In Monsoon In India : पावसाळ्यात मित्र- मैत्रिणींसोबत ट्रिपला जाण्याचा प्लॅन ठरतो, पण जायचे कुठे असा प्रश्न अनेकदा पडतो. यात मुंबई, कोकणातील काही ठिकाणी आपण फिरून येतो, मात्र महाराष्ट्राशिवाय इतर राज्यांमध्येही पावसाळ्यात अनेक ठिकाणं अशी आहे, जी पाहण्यासारखी आहेत. त्यामुळे यंदा तुम्ही मित्र- मैत्रिणींसोबत एखाद्या सुंदर ठिकाणी ट्रिपला जाण्याचा प्लॅन करत असाल तर भारतातील काही परफेक्ट सुंदर अशी ठिकाणं तुम्हाला सांगणार आहोत. ज्याठिकाणी मित्र-मैत्रिणींसोबत जाऊन तुम्ही सुंदर आठवणी बनवू शकता. ज्या तु्म्हाला आयुष्यभर आठवणीत राहतील, चला तर मग जाणून घेऊ अशा ठिकाणांबद्दल…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोकर्ण

कर्नाटकातील गोकर्ण हे सुंदर पर्वत रांगांनी वेढलेले एक पर्यटन स्थळ आहे. याठिकाणचे अथांग पसरलेले स्वच्छ समुद्र किनारे पाहून तुमचे ह्रदय हरवून जाईल. मित्र-मैत्रिणींसोबत बीच पार्टी करण्यासाठी हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते. येथील समुद्र किनाऱ्यावरील दृश्य गोव्यापेक्षा कमी नाही.

कुर्ग

बॅचलर पार्टीसाठी कर्नाटकातील कुर्ग हे एक सुंदर ठिकाण आहे, इथल्या हिरवाईपासून ते धबधबे आणि कॉफीच्या सुंदर मळे पाहून तुम्हीही भारावून जाल. याशिवाय तुम्ही येथे घोडेस्वारी आणि ट्रेकिंगचाही आनंद घेऊ शकता.

मुन्नार

पावसाळ्यात मित्र-मैत्रिणींसह फिरण्यासाठी केरळमधील स्वर्ग मानले जाणारे मुन्नार हे ठिकाणं एकदम परफेक्ट आहे. पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य अगदी खुलून येते. चारही बाजूने पसरलेली हिरवळ, छोटे- छोटे वाहणारे झरे हे वातावरण आल्हाददायी असते. तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर मुन्नारमधील इको, पॉइंट, एरविकुलम नॅशनल पार्क आणि कुंडला तलावाला नक्की भेट द्या.

दार्जिलिंग

जर तुम्हाला मित्र-मैत्रिणींसोबत ट्रिपला जायचे असेल तर तुमच्यासाठी दार्जिलिंग हे एक उत्तम ठिकाण आहे. इथल्या चहाच्या मळ्यांचे सौंदर्य पावसाळ्यात आणखीनच वाढते. हे ठिकाण केवळ प्रेक्षणीय स्थळांसाठी सर्वोत्तम नाही तर तुम्ही येथे निवांत क्षणही घालवू शकता. इथली टॉय ट्रेन तुमच्या सहलीची मजा द्विगुणित करेल.

शोजा

हिमाचल प्रदेशमधील शोजा नावाचे एक छोटे गाव आहे. चारही बाजूंनी डोंगर, दऱ्या असल्याने याच्या सौंदर्यात आणखी भर पडते. मित्र मैत्रिणींसोबत पावसाळ्यात फिरण्याचा प्लॅन असेल तर हे बेस्ट प्लेस आहे. इथले वॉटरफॉल पॉईंट पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. इथे गेल्यानंतर तुम्हाला निसर्गाच्या कुशीत असल्याचा भास होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon travel tips best 5 places in india for bachelor trip with friends during monsoon sjr