तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कशी करता यावर तुमचा संपूर्ण दिवस कसा जाणार हे ठरतं.तुम्ही आरोग्यदायी काही खाल्ले किंवा प्यायल्यास, तुमचा पुढील दिवस चांगला जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे नेहमीच दिवसाची सुरुवात ही पौष्टीक खाऊन केली पाहिजे. तुम्हाला माहितीच असेल की, शेवग्याची शेंग सुपरफूड म्हणून ओळखली जाते. आरोग्यासाठी पोषक असणारे कित्येक महत्त्वपूर्ण घटकांचा खजिना शेवग्याच्या शेंगमध्ये आहे. शेवग्याच्या शेंगप्रमाणेच या वनस्पतीची पाने देखील सौंदर्यवर्धक तसंच आरोग्यवर्धक आहेत. मोरिंगा म्हणजेच शेवगा वनस्पती. मोरिंगा हे एक सुपरफूड आहे जे तुमच्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सकाळी शेवग्याच्या पानांची पावडर पाण्यात टाकून पिणे तुमच्या आरोग्यासाठी गेम चेंजर कसे असू शकते हे जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोग्य फायदे

१. वजन कमी करण्यात मदत – वजन कमी करण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करत असाल तर सकाळी एक ग्लास शेवग्याच्या पानांच्या पाण्याचा फायदा होऊ शकतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) नुसार, मोरिंगा हे आहारातील फायबरचा समृद्ध स्रोत आहे. वजन कमी करणारा आहार घेत असताना, जास्त फायबर असलेले पदार्थ आणि पेये फायदेशीर ठरू शकतात कारण ते तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी पोट भरण्यास मदत करतात.

२. त्वचेच्या आरोग्यास प्रोत्साहन देते – शेवग्याच्या पानांची पावडर तुमच्या त्वचेला देखील फायदेशीर ठरू शकतो. मल्टीडिसिप्लिनरी डिजिटल पब्लिशिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की मोरिंगा बियांमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे त्वचेचे आरोग्य सुधारतात. त्यांचे सेवन केल्याने तुमची त्वचा चांगली हायड्रेटेड, मऊ आणि लवचिक राहू शकते. म्हणून, जर तुम्ही त्वचेच्या समस्यांनी त्रस्त असाल, तर मोरिंगाचे म्हणजेच शेवग्याच्या वनस्पतीचे सेवन केले पाहिजे.

३. तुमच्या केसांसाठी फायदेशीर – रोज सकाळी शेवग्याच्या पानांची पावडर पाण्यात टाकून पिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे केसांच्या आरोग्यावर होणारा परिवर्तनीय परिणाम. शेवग्याच्या पानांची पावडर आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे जसे की जीवनसत्त्वे A, B, C आणि E – हे सर्व केसांसाठी उत्तम आहे.

४. रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करते – एनआयएचच्या एका वेगळ्या अभ्यासात असे म्हटले आहे की शेवग्याच्या पानांच्या पावडरचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी करू शकते. आपल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याचे पाणी पिणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी, पाण्यात कोणतेही गोड पदार्थ घालणे टाळा.

मोरिंगा पेस्ट कशी बनवायची?

साहित्य –

मोरिंगा पावडर(शेवग्याच्या पानांची पावडर) : एक चमचा
पिकलेले अ‍ॅव्होकाडो (मॅश केलेले) : एक
मध : एक मोठा चमचा
पाणी : एक चमचा

कृती : एका वाटीमध्ये सर्व सामग्री एकत्र घ्या आणि पेस्ट तयार करा.

मोरिंगामध्ये एकापेक्षा जास्त मार्गांनी आपले आरोग्य बदलण्याची शक्ती आहे. वृद्धत्वाची लक्षणे दूर करायची असल्यास नियमित एक चमचा मोरिंगा पावडरचे सेवन करू शकता. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासही मदत मिळेल.