पावसाळ्याचा चिकचिकाट आणि ऑक्टोबरमधील उन्हाचा रखरखाट यावर मात करत मुंबईत स्थिरावलेल्या गुलाबी थंडीने अनेकांना सकाळच्या फिरण्यासाठी प्रेरणा दिली आहे. धकाधकीच्या आयुष्यात बठे आयुष्य जगताना चालण्याच्या व्यायामाचा सल्ला नेहमीच दिला जातो. चालणे हे आरोग्यासाठी हितकारक असले तरी सकाळी सकाळी धुक्यातून केलेला प्रवास अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतो.
मुंबईतील धुरक्याची समस्या नवी नाही. धूर आणि धुके यांचे मिश्रण म्हणजे धुरके. मुंबईत वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, सतत सुरू असलेल्या बांधकामांमुळे हवेत भरून राहणारे सिमेंट, रेतीचे अगणित कण तसेच कचरा जाळल्याने हवेत मिसळणारे वायू यामुळे वर्षभर प्रदूषण होत राहते. मात्र समुद्राने वेढलेल्या मुंबईत सकाळी दहा-अकरा वाजण्याच्या सुमारास समुद्रावरून येणारे जोरदार वारे हे सर्व प्रदूषण त्यांच्यासोबत घेऊन जातात आणि शहराची रोज सफाई होते. वर्षभर चालणारी ही क्रिया थंडीच्या ऋतूत मात्र मंदावते. समुद्रावरून येणारे वारे क्षीण होऊन त्यांची जागा उत्तर किंवा ईशान्येकडून जमिनीवरून वाहत येणारे तुलनेने कमी वेगाचे वारे घेतात. त्यामुळे हवेच्या नसíगक सफाईवर बंधने येतात. त्यातच हवेचा जमिनीलगतचा थर थंड झाल्याने अभिसरणाची क्रियाही मंदावते आणि कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड असे हानीकारक घटक जमिनीलगतच्या थरातच अडकून बसतात. समुद्रकिनारी असल्याने बाष्पाचे प्रमाणही जास्त असल्याने हवेत धुके पसरल्याचे दिसते. मात्र प्रत्यक्षात प्रदूषणकारी धूर व धुके यांच्या मिश्रणाने गडद धुरके मुंबईत पसरते. सकाळी मॉìनग वॉकसाठी बाहेर पडलेल्यांना शहरात हिल स्टेशन इफेक्ट दिसत असला, तरी प्रत्यक्षात मात्र ते आजारांसाठी निमंत्रण असते.
ऋतू बदलताना दमाविकार असलेल्या व्यक्तींना सर्वाधिक त्रास होतो. पण त्यासोबतच पटकन अॅलर्जी होत असलेल्या व्यक्तींना डॉक्टरांनी धोक्याचा इशारा दिला आहे. मुंबईतील वातावरणात प्रदूषण असतेच त्यामुळे वर्षभर अनेकांना संसर्ग होत असतो. त्यातच थंडीच्या दिवसात ही शक्यता अधिक वाढते. त्यातच सर्दी, खोकला झालेले रुग्ण सकाळी फिरायला गेले की त्यांचा त्रास वाढतो. श्वास घेण्यात अडथणे येणे, धाप लागणे अशा घटना सामान्यत: दिसून येतात, असे निरीक्षण डॉ. अशोक कोठारी यांनी नोंदविले. वेगाने चालताना अधिकाधिक हवा शरीरात गेल्याने त्याचाही त्रास होतो. योग्य आहार, आरामामुळे प्रतिकारक्षमता चांगली होते व अशा व्यक्तींना सकाळच्या फिरण्याची किंवा हवेतील संसर्गाची बाधा सहसा होत नाही. मात्र काही वेळा प्रदूषणाचा लगेच परिणाम जाणवला नाही तरी सतत कार्बन-नायट्रोजन ऑक्साइड शरीरात जात राहिल्याने फुप्फूसांची कार्यक्षमता कमी होऊ लागते. त्याचे परिणाम काही वर्षांनी दिसून येतात. फुप्फूसाचा काही भाग काम करत नसल्यामागे किंवा काही वेळा कर्करोगामागेही प्रदूषण कारणीभूत असते.
मॉर्निंग वॉक आरोग्याला अहितकारक..
पावसाळ्याचा चिकचिकाट आणि ऑक्टोबरमधील उन्हाचा रखरखाट यावर मात करत मुंबईत स्थिरावलेल्या गुलाबी थंडीने अनेकांना सकाळच्या
आणखी वाचा
First published on: 09-12-2014 at 06:16 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morning walk is bad for health