व्यायाम हा आरोग्यासाठी अतिशय गरजेचा असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. मग यातही जिमला जाणे किंवा इतर काही करण्यापेक्षा चालणे उत्तम आरोग्यासाठी अतिशय गरजेचे असते. यातही सकाळी उठल्याउठल्या चालायचा व्यायाम केल्यास त्याचा शरीराला चांगला फायदा होतो. सकाळची फ्रेश हवा उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त ठरतेच पण वजन कमी करण्यासाठीही सकाळी चालण्याचा चांगलाच फायदा होतो. सकाळी चालण्याने तुमची प्रतिकारशक्तीही सुधारण्यासही मदत होते. शरीरावरील अनावश्यक वाढलेली चरबी कमी करण्यासाठीही सकाळच्या चालण्याचा फायदा होतो. पाहूयात सकाळी चालण्याचे असेच काही फायदे…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. कॅलरीज जाळण्यासाठी उपयुक्त – सकाळी चालण्याने तुमच्या हृदयाची क्रिया सुधारते. हृदयाचे ठोके वाढण्याने तुमच्या कॅलरीज जळण्यासही मदत होते. त्यामुळे नकळतच तुमचे वजन कमी होते, म्हणून उत्तम आरोग्यासाठी रोज सकाळी चालायची सवय ठेवा.

२. चरबी जळण्यासाठी चालण्याने फायदा – सकाळी वेगाने चालल्यास तुमचा अॅरोबिक व्यायाम होतो. त्यामुळे तुमच्या शरीरावरील ३५ टक्के चरबी जळण्यास मदत होते. वेगाने एखादी गोष्ट केल्यास तुमच्या कॅलरीज आणि चरबी जळण्यास मदत होते. ही गोष्ट नियमाने केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो.

३. चयापचय क्रिया सुधारते – सकाळी चालण्याने तुमची चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे दिवसभर तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे चांगल्यारितीने पचन होते. चालण्यामुळे शरीरातील सर्व क्रियांना वेग मिळतो आणि पचनशक्तीला त्याचा चांगला फायदा होतो.

४. स्नायूंची ताकद वाढण्यास मदत – चालण्यामुळे शरीराला ताण पडतो आणि काही प्रमाणात चरबी कमी होते. त्यामुळे नकळतच स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होते. तब्येत चांगली ठेवायची असेल तर चरबीपेक्षा स्नायूंमध्ये ताकद असणे गरजेचे असते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morning walk is good for health know benefits of it
Show comments