Banana hack for mosquito: आता हिवाळ्याला सुरुवात झाली असून या दिवसांत डासांची दहशतही मोठ्या प्रमाणात वाढते. संध्याकाळी घरचे दरवाजे, खिडक्या उघड्या राहिल्यामुळे डास घरात शिरतात आणि हे रात्री झोपल्यानंतर तुम्हाला त्रास देऊ लागतात. डासांमुळे रात्री शांत झोप न मिळाल्याने दुसरा दिवसही चांगला जात नाही, ज्याचा परिणाम तुमच्या कामावरही होऊ लागतो. इतकेच नाही तर डास चावल्यामुळे डेंग्यूचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतो. अशा परिस्थितीत डासांना घरातून पळवून लावण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे.
आज आम्ही तुम्हाला एक अतिशय सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत, जो घरातील डासांना घालवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. विशेषत: तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि अशा परिस्थितीत तुम्ही डासांना दूर करण्यासाठी धोकादायक रसायने असलेली कॉइल वापरू शकत नसाल, तर हा उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.
डास दूर करण्यासाठी करा ‘हा’ उपाय
डास दूर करण्यासाठी तुम्ही केळीचे साल वापरू शकता. केळीच्या सालीतून येणारा तीव्र वास डासांपासून बचाव करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही ही पद्धत वापरून पाहू शकता.
डासांपासून बचाव करण्यासाठी केळीची साल कशी वापरावी?
हेही वाचा: दूध उकळवण्यासह पिण्यासाठी कोणत्या धातूच्या भांड्याचा वापर केला जातो?
यासाठी खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात केळीची साले ठेवू शकता. कोपऱ्यात डास जास्त दिसतात. अशा परिस्थितीत ही युक्ती डासांपासून दूर राहण्यास फायदेशीर ठरू शकते.
जर डास जास्त असतील तर केळीची साल जाळून दिवसातून एक किंवा दोनदा घरात फिरवू शकता. त्यातून निघणारा धूर आणि उग्र वासदेखील डासांचा नायनाट करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो.
याशिवाय मिक्सरमध्ये केळीची साल, थोडा कापूर आणि लव्हेंडर तेल घालून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवा. असे केल्याने डासही पळून जातात. केळी, कापूर आणि लव्हेंडर तेलाचा वास त्वरित डासांच्या प्रतिकारासाठी योगदान देऊ शकतो.