डेटिंगला गेल्यावर होणाऱया खर्चापैकी निम्मा खर्च सोबतच्या महिलेने दिला पाहिजे, असे जवळपास ६४ टक्के पुरुषांना वाटते… जर एखादी महिला डेटिंगला गेल्यावर कधीच स्वतःच्या पर्समधले पैसे काढत नसेल, तर ४४ टक्के पुरुषांना वाटते की तिच्यासोबतचे डेटिंग बंद करावे…अनेक पुरुषांना डेटिंगला गेल्यावर महिलेकडून पैसे घेतल्यावर अपराधीपणाचे वाटते… हे सर्व निष्कर्ष आहेत एका नव्या संशोधनाचे. 
चॅम्पमन विद्यापीठातील डेव्हिड फ्रेडरिक आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील त्यांचे सहकारी यांनी सुमारे १७ हजार महिला आणि पुरुषांच्या डेटिंगसंदर्भातील कल्पनांचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. या संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्ती अमेरिकेतील असल्या, तरी त्याचे निष्कर्ष सर्वत्र लागू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
या संशोधनातील काही निष्कर्ष…
डेटिंगला गेल्या ५७ टक्के महिला खर्चाची निम्मा हिस्सा उचलण्यास तयार असतात. मात्र, ३९ टक्के महिलांना डेटिंगचा खर्च सोबतच्या पुरुषानेच करावा, असे मनोमन वाटते.
पुरुष जेव्हा महिलेकडून खर्चाचा निम्मा हिस्सा उचलण्याची स्पष्टपणे अपेक्षा करतात, त्यावेळी ४४ टक्के महिलांना अवघडल्यासारखे होते.
थोड्या वेळासाठी डेटिंगला गेले असले, तरी ८४ टक्के पुरुष आणि ५८ टक्के महिलांना वाटते की खर्च हा पुरुषांनीच केला पाहिजे.
जर खर्च महिलेने केला तर ७६ टक्के पुरुषांना ते अपराधीपणाचे वाटते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most men want women to go dutch on a date
Show comments