‘मदर डेअरी’ने दुधाचे दर वाढवत असल्याचे जाहीर केले आहे. फुल क्रीम दुधाची किंमत २ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. ज्यामुळे आता फुल क्रीम दुधाची किंमत प्रति लिटर ६६ रूपये होईल. तर टोन्ड दुधाची किंमत प्रतिलिटर ५१ रुपयांवरून ५३ रुपये करण्यात आली आहे. गाईचे दुध आणि टोकन मिल्क प्रकारांच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही, असे ‘मदर डेअरी’ने सांगितले आहे.

डबल टोन मिल्कची किंमतही २ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. यामुळे याची किंमत प्रति लिटर ४५ रुपयांवरून ४७ रुपये झाली आहे.

दुधाचे दर वाढवण्याची ‘मदर डेअरी’ची ही पाचवी वेळ आहे. दिल्ली एनसीआर भगत याआधीही दुधाचे दर वाढवण्यात आले होते. दिल्ली एनसीआर भागात याआधीही फुल क्रीम दुधाची किंमत प्रति लिटर १ रुपये तर टोन्ड मिल्कची किंमत प्रति लिटर २ रुपयांनी वाढवण्यात आली होती.

Story img Loader