Mother’s Day 2022 Wishes in Marathi : ‘आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. आईचे प्रेम, ममता, वात्सल्य, पाठिंबा, बळ यासाठी एक दिवस पुरेसा नाही. पण आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस साजरा केला जातो. तो म्हणजे मदर्स डे. आज, १० मे रोजी भारतासह जगभरात ‘मदर्स डे’ उत्सहात साजरा केला जात आहे. आईवरचं प्रेम साजरं करण्याचा हा दिवस. खरंतर आईवरील प्रेम दाखवण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे का? किंवा एकच दिवस का? यांसारखे प्रश्न, शंका दूर सारून आजकाल तरुणाई मदर्स डे अगदी उत्साहाने साजरा करताना दिसते. आईचे आपल्या आयुष्यातील स्थान अगदी अनन्यसाधारण असते. तिचे महत्त्व, महती व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. पण अनेक थोरामोठ्यांनी आपल्या लेखणीतून आईची थोरवी शब्दात मांडली आहे. मदर्स डे निमित्त पाहुया आईबद्दलचे थोरामोठ्यांचे विचार…

शांताबाई शेळके यांची एक छान कविता आहे. आई म्हणजे काय ते मुलानं सांगितलं आहे-
आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी
औषधावर दिलेली लिमलेटची गोळी
आई म्हणजे प्रसादाचा खडीसाखर खडा
शाळेआधी पाटीवर लिहून दिलेला धडा
आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात
मेतकूट कालवलेला मऊ तूपभात
आई म्हणजे देव्हाऱ्यातले लक्ष्मीचे चित्र
सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित

आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!
सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही
– फ.मुं. शिंदे

‘आई माझा गुरू : आई माझे कल्पतरू, आईचे प्रेम आकाशाहून मोठे आणि सागराहूनही खोल आहे.
– साने गुरूजी

‘चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई
गोठय़ात वासरांना या चाटतात गाई,
वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा व्याकूळ मात्र होई,
नोहेचि हाक माते मारी कुणी कुठारी
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!’

‘आ’ म्हणजे आत्मा’ आणि ‘ई’ म्हणजे ‘ईश्वर’. आत्मा आणि ईश्वराचा संगम म्हणजे ‘आई’
– गीतकार शांताराम नांदगावकर

‘आई’ नावाच्या अमृतवेलीवर सदाबहार फुले फुलतात. आपल्याला लहानपण पुन्हा हवे असते. कारण आईच्या कुशीत झोपायला मिळते आणि आई आपल्या हाताने बालकाला अमृतमय घास भरवते. म्हणूनच पृथ्वीच्या पाठीवर शाश्वत टिकणारे प्रेमाचे आणि मायेचे एकमेव नाव म्हणजे ‘आई!’

‘आई एक उत्तम शिक्षिका असते. तीच आपले सर्वस्व घडविते.’
-बाबा आमटे

माय म्हणजे शुद्ध गंगेचे उदक! तिच्या मायेची शाल अंगावर घेताना किती प्रसन्न वाटतं!
– सरोजिनी बाबर

‘दिला जन्म तू विश्व हे दाविलेस
किती कष्ट माये सुखे साहिलेस,
जिण्यालागी आकार माझ्या दिलास,
तुझ्या वंदितो माउली पाऊलांस!’
– ग. दि. माडगूळकरांनी

‘माय मराठी माऊली
आभाळाची तू सावली,
गंगा आली ग अंगणी
तुझ्या पावलामधून..’
– शांता शेळके

‘आई नावाची वाटते
देवालाही नवलाई,
विठ्ठलही पंढरीचा
म्हणे स्वत:ला विठाई!’

– म. भा. चव्हाण

‘अरे खोप्यामधील खोपा
सुगरणीचा चांगला,
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला।’
-बहिणाबाई

‘ठेच कान्हूला लागली
यशोदेच्या डोळा पाणी
राम ठुमकत चाले
कौसल्येच्या गळा पाणी,
देव झाला तान्हुला ग
कुशीत तू घ्याया,
तिथे आहेस तू आई
जिथे आहे माया!!’

– मंगेश पाडगावकर

‘ती आई होती म्हणूनी
घनव्याकूळ मीही रडलो,
त्यावेळी वारा सावध
पाचोळा उडवीत होता,
ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता!’
– ग्रेस

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी – कवी यशवंत

न ऋण जन्मदेचे फिटे – मोरोपंत

प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई !

बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ? – माधव ज्युलियन

आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही – ग. दि. माडगूळकर

देव जगात सगळीकडे राहू शकत नाही म्हणून देवाने प्रत्येकाला आई दिली.

गरीब- श्रीमंत, साक्षर-निरक्षरतेसारख्या कोणत्याही चौकटीत ‘आई’ नावाची व्याख्या अडकत नाही. असा आशय मांडणारी कवी हेमराज बागूल यांची कविता उत्कटतेने म्हणते-

‘माय म्हणजे एक मोठी ऊब
पोराला कवटाळणारा तिचा फाटका पदर
अडवू शकतो जगातील कोणतीही हिमलाट!
माय पुस्तकी अनपढ असली तरी
ती असते अनुभवांची अधिष्ठाता
संस्कारांची कुलगुरू नि स्वयंभू मुक्त विद्यापीठही!’

Story img Loader