बाळाच्या आरोग्यासाठी ‘आईचे दूध’ हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. आईच्या दुधात नवजात शिशुसाठी आवश्यक ती सर्व पोषणमुल्ये असतात. आईच्या स्तनाचे दूध नैसर्गिक असून त्याला पचविणे सोपे आणि बाळाला पोषणासाठी सुवर्ण मानक आहे. यामध्ये पोषणद्रव्याचे योग्य संतुलन असल्याने बाळाच्या गरजा आणि बाळाला रोग प्रतिकारकशक्ती निर्माण करण्यास चालना देण्यास मदत करणारे घटक असतात. तथापि, काही विशिष्ट परिस्थितीत काहीवेळा विशेष स्तनपानाची गरज असते.
‘स्तनपान’ हाच बाळासाठी सर्वोत्तम आहार असतो. बाळाला सहा महिन्यांपर्यंत दुसरे कोणतेही अन्न न देता केवळ आईचे दूध दिले पाहिजे. पण, बाळ निदान एक वर्षाचे होईपर्यंत त्याला आईचे दूध देणे गरजेचे आहे. स्तनाचे दूध निर्जंतुक असल्यामुळ त्याला उकळण्याची आवश्यकता नसते, आणि म्हणून त्याची पोषक तत्वे तशीच राखली जातात. तसेच, अस्वच्छता आणि असुरक्षित आहार पद्धतीपासून बाळास जंतूसंक्रमण होण्यापासूनही ते दूर ठेवते. आईचे दूध मधुर, कषाय रसात्मक, स्निग्ध, बलवर्धक, शीत गुणात्मक, डोळ्यांना हितकर अशा गुणांचे असते. आईच्या दुधात कार्बोहायड्रेट्स (दुग्धशर्करा), प्रथिने, लोह आणि कॅल्शियम या पोषणाव्यतिरिक्त विशेष IgA आणि IgB यांसारखे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात.
गहू, ओट्स, बार्ली, राय या धान्यांमध्ये आणि काही इतर कडधान्यांमध्ये ‘ग्लूटेन’ नामक प्रथिन आढळते. आहारात ग्लुटेनचा समावेश असल्यास बाळास आवश्यक ती पोषणद्रव्ये मिळत नाही आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी होते. जर आईचे दूध बाळास दिले तर ग्लुटेनचा धोका टाळता येऊ शकतो.
बाळ एक वर्षाचे होईपर्यंत त्याला आईचे दूध न देता बाजारातील कृत्रिम दूध देऊन त्यांच्या आरोग्याशी लक्षणीय तडजोड केली जाते, असे हैद्राबाद येथील नॅशनल इन्स्टिटूड ऑफ न्यूट्रिशनच्या संशोधकांचे म्हणणे आहे. त्यांनी केलेल्या नवीन सर्वेक्षणानुसार, भारतातील दोन महिन्यांपेक्षा लहान असलेल्या केवळ ६९ टक्के बाळांना स्तनपान करण्यात आले आहे. तर, दोन ते तीन महिन्यांच्या बाळांच्या स्तनपानाची संख्या ५१ टक्क्यांनी घसरली असून चार ते पाच महिन्यातील बाळांच्या स्तनपानाची संख्या २८ टक्क्यांनी कमी झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा