Mukesh Ambani Strict Diet Plan: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा अभूतपूर्व विवाह सोहळा आता पूर्ण पार पडला आहे. साधारण सात महिने चालू असलेल्या विवाह सोहळ्यात साखरपुडा, दोन प्री वेडिंग, संगीत, मेहेंदी, हळद, गृहशांती, लग्न, रिसेप्शन असे प्रमुख कार्यक्रम साजरे केले गेलेच, पण त्याबरोबरीने असंख्य कॉकटेल पार्ट्या, लहान मोठे विधी सुद्धा लक्षवेधी ठरले. याच कार्यक्रमांच्या दरम्यान जुलै महिन्याच्या सुरुवातीला नीता अंबानी काशी विश्वनाथ मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळेस काशीतील स्नॅक्सच्या दुकानात त्यांनी काही प्रसिद्ध चाट पदार्थांचा आस्वाद घेतला होता. उपस्थित स्थानिकांसह गप्पा मारताना नीता अंबानी यांनी आपले पती मुकेश अंबानी यांच्या डाएटविषयी काही खास गोष्टी शेअर केल्या होत्या. चला तर मग मुकेश अंबानी यांचं डाएट रुटीन कसं आहे हे पाहूया..

मुकेश अंबानी यांचे आवडते पदार्थ (Mukesh Ambani Favorite Recipes)

नीता अंबानी यांनी सांगितलं की मुकेश अंबानींना सहकुटुंब जेवणाचा आस्वाद घेणं फार आवडतं. त्यातही प्रामुख्याने घरगुती जेवणच त्यांचं सगळयात आवडतं आहे. सीनियर अंबानी हे स्वतः शुद्ध शाकाहारी आहे आणि खाण्याबाबत काटेकोरपणे पथ्य पाळतात. आठवड्यातून एकदा बाहेर खाणं होत असेल अन्यथा ते घरीच जेवतात.

David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Minimum Support Price for Agricultural Produce
शेतमालाला हमीभाव नाहीच ; केंद्राच्या धडपडीनंतरही शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
supreme court rejects sebi penalty on mukesh ambani In rpl shares case
सर्वोच्च न्यायालयाचा मुकेश अंबानींना दिलासा; ‘आरपीएल शेअर्स’प्रकरणी ‘सॅट’च्या आदेशाला सेबीचे आव्हान फेटाळले!

नीता अंबानींनी गप्पांदरम्यान मुकेश अंबानी यांच्या आवडीची एक गुजराती रेसिपी सुद्धा शेअर केली. अंबानींना पानकी हा पारंपरिक पदार्थ खूप आवडतो. तांदळाच्या पिठात मेथी व हळद घालून बनवलेलं मऊ पण मसालेदार मिश्रण हे केळीच्या पानात गुंडाळून शिजवलं जातं आणि नंतर चीज घालून त्याची सजावट केली जाते. हा नाश्त्याचा प्रकार लोणचं किंवा चटणीसह खाता येतो. हा पदार्थ खूप आरोग्यदायी आहे असेही नीता अंबानींनी खास अधोरेखित केले होते. शिवाय ताजी फळे, फळांचा रस, इडली असा साधा नाश्ता सुद्धा त्यांना आवडतो. दिवसातील पहिलं जेवण (खाणं) हे पचनसंस्थेसाठी सोपे असेल व शरीरासाठी पोषक असेल असा त्यांचा प्रयत्न असतो.

लंच आणि डिनरसाठी अंबानी काय खातात? (Mukesh Ambani Lunch- Dinner Plans)

अंबानी दुपारी व रात्री सुद्धा साधं, सात्विक व सकस जेवण निवडण्यास प्राधान्य देतात. एक भाजी, आमटी, सूप किंवा सॅलेड त्यांच्या दोन्ही वेळच्या जेवणात असतं. विशेष म्हणजे वारंवार असंख्य मेजवान्या आणि सोहळ्यांमध्ये भाग घेत असूनही, ते शाकाहारी आहाराचे काटेकोरपणे करतात इतकंच नाही तर कोणत्याही प्रकारचे जंक फूड सुद्धा घेत नाहीत. आहारनियंत्रण हे त्यांच्या ऊर्जेचं केंद्र आहे.

हे ही वाचा<< ऑफिसच्या डब्यात ‘हे’ तीन पदार्थ असायलाच हवेत! पोषणतज्ज्ञांनीच सांगितला, काम करताना ऊर्जा वाढवण्याचा सोपा फंडा

मुकेश अंबानींचा दिवस सकाळी ५.३० लाच होतो सुरु (Mukesh Ambani Exercise)

केवळ आहाराच नव्हे तर मुकेश अंबानी व्यायाम सुद्धा काटेकोरपणे करतात. मुकेश अंबानी रोज सकाळी ५.३० च्या सुमारास उठून योग व ध्यानधारणा करतात. सकाळी शक्यतो सूर्यनमस्कार, चालणे, ध्यान करणे असे त्यांची रुटीन असते. सकाळी व्यायामाने दिवसाची सुरुवात केल्याने दिवसभर ऊर्जा जाणवते तसेच शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी मदत होते. सुरुवातीपासूनच मानसिक व शारीरिक स्वास्थ्याला मुकेश यांनी खूप महत्त्व दिले आहे असेही नीता अंबानी म्हणाल्या.