How to Use Multani Mitti: बदलत्या हवामानामुळे त्वचा चिकट आणि तेलकट होते. त्याशिवाय अनेकांची त्वचा चिकट आणि तेलकट असते, ज्यामुळे त्यांना नेहमीच चिकटपणाचा त्रास होतो. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी एक नैसर्गिक फेस पॅक घेऊन आलो आहोत, जो तुम्ही तुमच्या चेहन्यावर सहजपणे लावू शकता.
चेहऱ्याची त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी मुलतानी मातीचा वापर पुरातन कालापासून केला जात आहे. मुलतानी माती चेहऱ्यावर लावल्याने चेहरा निरोगी आणि चमकदार होतो. त्यामुळे चेहऱ्यावर जास्त तेल येण्यापासून बचाव होतो. खरे तर, चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेण्याबरोबरच, ती त्वचेचे लहान छिद्रेदेखील स्वच्छ करते आणि त्वचा सुधारते.
तेलकटपणा कमी करण्यासाठी मुलतानी मातीचा फेस पॅक
जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर करायचा असेल, तर तुम्ही मुलतानी मातीचा फेसपॅक सहजगत्या बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला २ चमचे मुलतानी माती, १ चमचा गुलाबपाणी व १ चमचा लिंबाचा रस मिसळून योग्य रीतीने पेस्ट तयार करावी लागेल आणि ती चेहऱ्यावर लावून १५-२० मिनिटे तशीच ठेवावी लागेल. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा फेस पॅक त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेतो आणि त्वचा ताजी बनवतो.
कोरड्या त्वचेसाठी मुलतानी मातीचा फेस पॅक
मुलतानी मातीचा फेस पॅक लावून तुम्ही कोरड्या त्वचेसंबंधीची समस्याही दूर करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम २ चमचे मुलतानी माती, १ चमचा मध व १ चमचा दूध मिसळून पेस्ट तयार करा आणि सुमारे १५ मिनिटे चेहन्यावर लावून ठेवा. काही वेळाने कोमट पाण्याने धुवा. हा फेस पॅक त्वचेला आतून हायड्रेट करून, ती मऊदेखील करतो.