त्वचेच्या संबंधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण बरेचदा मुलतानी मातीचा वापर केला असेल. मुलतानी माती चेहऱ्याच्या चांगल्या स्वच्छतेसाठी वापरली जाते. म्हणूनच मुलतानी मातीच्या मदतीने अनेक सौंदर्य उत्पादने तयार केली जातात. मात्र मुलतानी मातीचे इतरही अनेक फायदे आहेत हे फार कमी लोकांना माहिती असेल. याद्वारे अनेक आजारांपासून मुक्ती मिळू शकते. या मातीत कॅल्शियम, हायड्रेटेड अॅल्युमिनियम सिलिकेट, सोडियम आणि मॅग्नेशियम सारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. आज आपण मुलतानी मातीचा आणखी कसा उपयोग होऊ शकतो हे जाणून घेऊया.
मुलतानी मातीचे इतर फायदे
- सांधेदुखीपासून आराम
वाढत्या वयामुळे किंवा कोणतेही जड कामे केल्यामुळे सांधे किंवा स्नायू दुखणे ही सामान्य समस्या आहे. जर तुम्हाला पाय आणि गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही मुलतानी मातीने या भागाला शेक देऊ शकता. असे केल्याने वेदना दूर होतील. या मातीचा लेप तयार करा आणि शरीराच्या प्रभावित भागावर ठेवा. असे केल्याने जडपणा आणि सूज निघून जाईल.
मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास दूर होईल ताण-तणाव; जाणून घ्या शरीराला होणारे इतर फायदे
- रक्ताभिसरण चांगले होईल
मुलतानी मातीच्या मदतीने शरीरातील रक्ताभिसरण सुधारले जाऊ शकते, यासाठी माती पाण्यात भिजवून पेस्ट तयार करा आणि नंतर शरीराच्या भागांवर घासून घ्या. पूर्ण सुकल्यावर स्वच्छ पाण्याने धुवा. काही वेळातच तुम्हाला शरीरातील रक्तप्रवाह सुधारल्याचे दिसून येईल.
- पोटाची जळजळ दूर होईल
आपल्या सर्वांना माहित आहे की मुलतानी मातीचा प्रभाव खूप थंड असतो, त्यामुळे त्याच्या मदतीने अॅसिडिटी आणि पोटातील जळजळ दूर केली जाऊ शकते. यासाठी एका भांड्यात किमान पाच तास मुलतानी माती भिजत ठेवा. त्यानंतर एका कपड्याच्या मदतीने ती अर्धा तास पोटाला बांधून ठेवावी. यानंतर काही वेळातच ही समस्या दूर होईल.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)