‘शतावरी’ ही एक उत्तम औषधी वनस्पती असून ती काटेरी झुपकेदार वेल स्वरूपात असते. कडू-गोड चवीची, शीतवीर्य असलेल्या शतावरीची मुळे व पाने औषध म्हणून वापरली जातात. शतावरीचा उपयोग स्त्रीयांच्या लैगिंग इच्छाशक्तित वाढ होणे, बाळंतपणातील अशक्तपणा दूर करण्यासाठी, दूध वृध्दीसाठी व प्रजोत्पादनासाठी होतो. शतावरी म्हणजे ‘शत-आवरी’ म्हणजेच ‘१०० नर ताब्यात असलेली नार’ असा होतो. शतावरीच्या मुळया दूधात वाटून लावल्यास स्तन वृध्दीसाठी त्याचा उपयोग होतो.
शतावरीच्या कंदामध्ये सँपोनीन, ग्लायकोसाईडस, फॉस्फरस, रायबोफलेवीन, थायमीन, पोटँशियम, व इतरही रासायनिक द्रव्ये आहेत. शतावरीमध्ये व्हिटॅमिन –ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी-कॉम्पलेक्स जास्त प्रमाणात आढळतात. कँसर, क्षयरोग, कुष्ठरोग, आम्लपित्त, एडस इत्यादी आजारांवर उपचार करण्यासाठी शतावरी उपयोगात आणतात. कॅन्सरच्या रूग्णांना तर शतावरी वरदानरूप ठरली आहे.
ही कडू-गोड चवीची, काटेरी झुपकेदार आरोहिणी वेल, म्हणजेच औषधी वनस्पती मुख्यत: आम्लपित्त दोषासाठी वापरली जाते. शतावरीचा अजून उपयोग पोटाचा अल्सर, ज्वर, शरिरपुष्टता, वात, पित्त, जुलाब यासाठीतर होतोच, शिवाय ब्रॉन्कायटिस, मुदतीचा ताप आणि मुख्य म्हणजे शरिरातील द्रव्याचा समतोल राखण्यासाठीही होतो. अशा त-हेने अनेक व्याधींसाठी उपकारक असलेल्या शतावरीस ’वनस्पतींची राणी’ संबोधणे चुकीचे ठरणार नाही.
बहुपयोगी ‘शतावरी’
'शतावरी' ही एक उत्तम औषधी वनस्पती असून ती काटेरी झुपकेदार वेल स्वरूपात असते.
First published on: 24-08-2013 at 05:49 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Multi functional asparagus