नियमितपणे व्यायाम करणाऱ्या वृद्ध व्यक्तींनी नृत्य केल्यास त्यांच्या मेंदूवर वार्धक्याचा परिणाम कमी होण्यास मदत होते, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. वयोमानानुसार ढासळणाऱ्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेवर व्यायामाचे सकारात्मक परिणाम शरीरावर होत असल्याचे जर्मन न्यूरोडीजनरेटीव केंद्राच्या कॅथरिन रेहफेल्ड यांनी सांगितले.

दोन प्रकारच्या व्यायामामूळे (नृत्य आणि सहनशक्ती प्रशिक्षण) मेंदूतील वयोमानानुसार घटणाऱ्या भागाचा विस्तार होतो. या तुलनेने नृत्यामुळे मेंदूच्या संतुलनात सुधारणा होत असल्याचे आढळले आहे, असे रेहफेल्ड यांनी सांगितले. सरासरी ६८ वय असणाऱ्या लोकांनी या अभ्यासात सहभाग घेतला होता. यात त्यांना दोन गटात विभागण्यात आले. एका गटाने अठरा महिन्यात प्रतिसप्ताहात नृत्य आणि दुसऱ्या गटाने सहनशक्ती प्रशिक्षणाचा व्यायाम केला. दोन्ही गटातील व्यक्तींच्या मेंदूच्या ‘हिप्पोकैम्पस’ या भागाचा विस्तार झाला. मेंदूतील या भागाला वयोमानानुसार होणाऱ्या आजारांचा धोका असून स्मृतिभंरशाच्या आजाराचादेखील यावर परिणाम होतो. ‘हिप्पोकैम्पस’  स्मरणशक्ती, नव्या गोष्टी शिकणे आणि शारीरिक संतुलन राखणे या क्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. पारंपरिक व्यायामात वारंवार त्याच हालचाली करावयाच्या असतात, ज्यामध्ये सायकलिंग किंवा (नॉर्डिक वॉकिंग) दोन काठीच्या सहाय्याने चालणे याचा समावेश होतो. आम्ही या अभ्यासात सहभाग झालेल्या लोकांना नेहमी नव्या प्रकारचे नृत्य करण्याचे आव्हान दिले. यामध्ये जाझ, स्केअर, लॅटिन-अमेरिकन नृत्य आणि लाईन नृत्याचा समावेश होता. असे अभ्यासाच्या मुख्य लेखिका रेहफेल्ड यांनी सांगितले. या अभ्यास फ्रंटियर्स नियतकालिकात हय़ुमन न्युरोसायन्समध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Story img Loader