Can you wash your hair on periods?: मासिकपाळी दरम्यान आंबट पदार्थ खाऊ नका! मासिक पाळीत महिलांना अशुद्ध रक्त येते! मासिकपाळीत मेंस्ट्रुअल कप वापरल्यास वर्जिनिटी गमावण्याचा धोका असतो! अशी अनेक मिथके आहेत ज्या मासिकपाळीशी जोडल्या गेल्या आहेत. यासोबत तुम्ही महिलांना असेही म्हणताना ऐकले असेल की महिलांनी मासिक पाळीच्या वेळी केस धुवू नये कारण त्यामुळे त्यांच्या गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. चला, जाणून घेऊया या मिथकाविषयी तज्ञांकडून…

मासिकपाळी दरम्यान केस धुतल्याने महिलांना वंध्यत्व येऊ शकते का?

अलीकडेच, डॉक्टर तनया नरेंद्रने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, “असं काहीही करू नका, ही मिथक अजिबात ऐकू नका. तुमच्या मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही तुमचे केस कितीही वेळा धुवू शकता. मासिक पाळीच्या वेळी केस धुवू नयेत या मिथकाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “लोकांचा असा गैरसमज आहे की जर तुम्ही मासिक पाळीदरम्यान केस धुतले तर तुमचे डोके सर्व पाणी शोषून घेईल आणि त्या थंड ऊर्जेला गर्भाशयमध्ये प्रसारित करेल. ज्यामुळे तुमचे गर्भाशय भविष्यात मुले निर्माण करू शकणार नाही.”

A glass of milk a day could help keep bowel cancer away
Milk: रोज एक ग्लास दूध प्यायल्याने आतड्यांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो का? वाचा काय सांगतात डॉक्टर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
buldhana hair loss loksatta news,
पाण्यामुळे नव्हे, ‘फंगस’मुळे केस गळती… आता खुद्द मंत्रीच म्हणाले, बिनधास्त आंघोळ…
Car Cabin Bad Smell
तुमच्याही गाडीमध्येही सतत घाणेरडा दुर्गंध येतो? मग एका स्वस्तातल्या सोप्या उपायाने गाडी आतून होईल फ्रेश
The video captured two women in a physical altercation.
दिल्ली मेट्रो तरूणींची केस ओढून मारामारी! जागा दिली नाही म्हणून थेट मांडीवर बसली तरुणी; भांडणाचा Video Viral

( हे ही वाचा: पाठीच्या ‘या’ भागात दुखणे ठरू शकते हृदयविकाराच्या झटक्याचे कारण; जाणून घ्या तज्ञांनी दिलेली महत्वाची माहिती)

मासिकपाळी दरम्यान आंघोळ केल्यास काय होते?

याशिवाय काही महिलांना असे देखील वाटते की मासिक पाळीच्या वेळी केस धुण्याने केस गळतात. हे सुद्धा एक मिथक आहे आणि पूर्णपणे असत्य आहे कारण मासिक पाळीच्या दरम्यान आपले केस धुणे किंवा आंघोळ करणे टाळण्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. याऊलट गरम पाण्याने अंघोळ केल्यास मासिकपाळी दरम्यान होणाऱ्या क्रॅम्पिंगची समस्या कमी होण्यास मदत होते.

डॉ. तान्या यांच्या म्हणण्यानुसार, “तुमच्या संपूर्ण शरीरातील टाळू आणि त्वचा वाटरप्रूफ असते. त्यामुळे ते पाणी शोषून घेणार नाही आणि त्यामुळे तयार होणारी थंड ऊर्जा तुमच्या गर्भाशयात येऊ शकत नाही.” त्यामुळे तुम्हाला मासिकपाळीच्या कारणाने वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयींशी तडजोड करण्याची गरज नाही.

( हे ही वाचा: Benefits of Roasted Gram: भाजलेले चणे खाल्याने कोलेस्ट्रॉल, मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते; तज्ञांनी सांगितलेले त्याचे ७ मोठे फायदे जाणून घ्या)

पण मासिक पाळीचा तुमच्या केसांवर परिणाम होऊ शकतो का?

ज्याप्रकारे मासिकपाळी तुमच्या मनःस्थितीवर आणि त्वचेवर परिणाम करते, त्याचप्रमाणे तुमच्या केसांवरही परिणाम होऊ शकतो. मासिक पाळीच्या दरम्यान हार्मोन्सची पातळी बदलते. त्यामुळे तुमचे शरीर अधिक टेस्टोस्टेरॉन तयार करू शकते, ज्यामुळे सीबमचे प्रमाण वाढू शकते आणि तुमचे केस तेलकट आणि चिकट होऊ शकतात. याव्यतिरिक्त, तुम्हाला केस गळण्याची लक्षणे देखील दिसू शकतात.

मात्र हे सर्व हार्मोनच्या बदलामुळे होते, तुम्ही मासिकपाळी दरम्यान केस धुत असल्यामुळे नाही. डॉ. तान्या म्हणाल्या, “मासिक पाळी सुरू असताना, कृपया स्वतःची काळजी घेण्याचे लक्षात ठेवा. तो एक वेदनादायक अनुभव आहे. म्हणून जर आंघोळ करणे आणि डोके धुणे तुमच्यासाठी योग्य असेल तर ते करा, तसे नसेल तर करू नका.” त्यामुळे महिलांसाठी हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. परंतु अशा मिथकांकडे लक्ष देण्यापूर्वी किंवा अनुसरण करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Story img Loader