हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीत वनस्पती आणि प्राणी यांसारख्या निसर्गाच्या घटकांना विशेष स्थान आहे. आपले बरेच उपवास आणि सण फक्त या नैसर्गिक घटकांवर आधारित आहेत. यापैकी एक सण म्हणजे नाग पंचमी. या सणाला नागाची पूजा केली जाते. नाग पंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या वर्षी नाग पंचमी १३ ऑगस्ट, शुक्रवारी आहे. नाग देवता भगवान शिव यांनाही प्रिय आहेत, म्हणून या दिवशी भगवान शिव आणि नाग देवता यांची पूजा केली जाते. नाग पंचमीच्या पूजेची तारीख, वेळ आणि पद्धत जाणून घेऊया.
नाग पंचमीची तारीख आणि वेळ
या वर्षी, पंचमी १२ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३४ पासून सुरू होईल आणि १३ ऑगस्ट रोजी सकाळी १.४२ पर्यंत राहील. नाग पंचमीचा सण १३ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. पूजेसाठी सर्वात शुभ वेळ १३ ऑगस्ट रोजी सकाळी ५.४९ ते ८.२८ पर्यंत असेल.
नागपंचमीच्या पूजेची पद्धत
नागपंचमीच्या दिवशी, सकाळी स्नान केल्यानंतर, सर्वप्रथम सापाच्या देवतेचे चित्र घराच्या दरवाजावर माती, शेण किंवा गेरूने काढावे. त्यानंतर त्यावर दुर्वा, फुले, पाणी आणि दूध अर्पण करावे. सर्पदेवतेला शेवया किंवा खीर अर्पण केली जाते. नाग पंचमीच्या दिवशी सापांना दुधाने आंघोळ घालावी किंवा त्यांना खाऊ घालावे असं कुठेही लिहिलेलं नाही. दूध हे सापांसाठी वैज्ञानिकदृष्ट्या हानिकारक आहे, म्हणून ते करू नये. या दिवशी नाग देवतेचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. नाग पंचमीच्या दिवशी सापांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घ्यावी. या दिवशी अष्टनागाच्या या मंत्राचा जप करावा.
नाग पंचमीचे महत्त्व
नागपंचमीतील काल सर्प दोष दूर करण्यासाठी नाग देवतेसोबत भगवान शिव आणि रुद्राभिषेक यांची पूजा करावी असं म्हंटलं जातं. नाग पंचमीची पूजा केल्याने कोणत्याही प्रकारच्या काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते. या दिवशी नाग देवतेची पूजा पूर्ण विधीने केली पाहिजे, यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते.