Nails Colour health tips: प्रत्येक मुलीला सुंदर आणि मजबूत नखे हवी असतात. पण, व्यग्र जीवनशैलीमुळे नखांची काळजी घेणे कठीण होते. तुमचीही नखे लगेच तुटतात किंवा वाढतच नाही का? तसे असल्यास, हे कमकुवत नखांचे लक्षण असू शकते. ही समस्या पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये सामान्य आहे आणि विविध कारणांमुळे ती होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये कोरडे हवामान किंवा वारंवार हात धुणे यांसारखी बाह्य कारणे असू शकतात. तर बऱ्याचदा अंतर्गत घटक, मुख्यतः आपल्या आहारामुळेही नखे कमकुवत होऊ शकतात. जर आपण योग्य पोषक घटकांचा आहारात समावेश केला नाही, तर त्याचा दुष्परिणाम आपल्या नखांवर होतो. तुमची नखे तुमच्या आरोग्याविषयी कितीतरी माहिती देऊ शकतात हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अलीकडेच पोषणतज्ज्ञ सिमरुन चोप्रा यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर याची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नखांचे आरोग्य

१. पातळ व मऊ नखे

अनेकांच्या चिंतेचे कारण असते ते म्हणजे पातळ व मऊ नखे. अशी नखे सहजपणे तुटतात आणि सहजपणे खराब होऊ शकतात. सिमरुन यांच्या मते, जर तुमची नखे पातळ आणि मऊ असतील, तर तुमच्या शरीरात ब जीवनसत्त्वाची कमतरता आहे. त्याव्यतिरिक्त तुमच्या आहारात कॅल्शियम, लोह व फॅटी अॅसिडची कमतरतादेखील असू शकते.

२. चमच्याच्या आकाराची नखे

नावाप्रमाणेच या प्रकारच्या नखांचा आकार चमच्यासारखा असतो. अशी नखे सरळ वाढण्याऐवजी चमच्यासारख्या आकारात वाढतात. तुमचीही नखे अशा प्रकारची असतील, तर तुम्हाला अशक्तपणा, हायपोथायरॉइडीझम किंवा यकृताच्या समस्या असू शकतात. हा त्रास थांबविण्यासाठी लोहयुक्त पदार्थांवर विशेष लक्ष केंद्रित करून, आपल्या आहारात आवश्यक त्या पोषक घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे.

३. नखांवर पांढरे डाग

नखांवर जे पांढरे डाग असतात, त्यांना ल्युकोनिचिया, असेही म्हणतात. नखांवर पांढरे डाग केवळ डाग नाहीत; ते तुमच्या आरोग्याविषयी इतर अनेक गोष्टी उघड करू शकतात. नखांवर पांढरे डाग जस्ताच्या कमतरतेचे किंवा बुरशीजन्य संसर्गाचे लक्षण असू शकते, असे पोषण तज्ज्ञ सांगतात. काही प्रकरणांमध्ये पांढरे ठिपके अॅलर्जीही असू शकतात.

हेही वाचा >> महिलांनो तुम्हीही मुळ्याची पानं टाकून देता का? थांबा! ‘हे’ ७ फायदे वाचून कळेल किती मोठी चूक करताय

४. पिवळी नखे

आणखी एक सामान्य प्रकारची नखे म्हणजे पिवळी नखे. सिमरुन यांच्या मते, तुमची नखे पिवळी होण्याचे सर्वांत सामान्य कारण म्हणजे जास्त प्रमाणात धूम्रपान करणे. त्याव्यतिरिक्त हे लक्षण बुरशीजन्य संसर्ग, श्वसन रोग, संधिवात किंवा थायरॉईड रोग असणे सूचित करू शकते. त्याशिवाय पिवळी नखे हेदेखील मधुमेहाचे लक्षण असू शकते. म्हणून वेळीच तुमच्या चाचण्या करून घ्या.

५.पांढरी नखे

पोषण तज्ज्ञ सांगतात की, जर तुमची नखे पांढरी दिसली, तर ते यकृत किंवा मूत्रपिंडाच्या समस्यांचे लक्षण असू शकते. तसेच हृदयाची समस्यादेखील असू शकते.