Natural Home Remedies for Open Pores : त्वचा म्हटली की त्याचा संबंधित अनेक समस्या सगळ्यांनाचं असतात. काही समस्या या लहान असतात तर काही समस्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्या गंभीर समस्या होऊन बसतात. कोरडी, निस्तेज त्वचा, त्वचेवर सतत मुरुम, पुटकुळ्या येणे, त्वचेचा पोत बिघडणे, त्वचा ऑयली होणे, लालसर पडणे अशा अनेक समस्या त्वचेसंदर्भात असतात. यापैकीच ओपन पोर्स ही समस्या आपल्यापैकी अनेकजणींना सतावते. आपल्या त्वचेवर अनेक लहान छिद्रे असतात, ज्यांना हेअर पोर्स असे म्हणतात. काहीवेळा वयानुसार चेहऱ्यावर हे ओपन पोर्स अधिक दिसू लागतात. ओपन पोर्स हे विशेषतः नाक, कपाळ, डोळ्यांखाली, गालांवर किंवा हनुवटीवर दिसतात. या चेहऱ्यावरील ओपन पोर्सवर जर आपण मेकअप किंवा कोणतेही ब्यूटी प्रॉडक्ट्स लावले तर त्वचेचे आणखी जास्त नुकसान होऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या ओपन पोर्सध्ये धूळ आणि घाणही साचू लागते, ज्यामुळे मुरुम किंवा ब्लॅक हेड्सची समस्या वाढते. अशा परिस्थितीत लोक हे कमी करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करू लागतात. यापैकी एक पद्धत म्हणजे चेहऱ्यावर बर्फ लावणे.बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचा घट्ट होते आणि छिद्र लहान होतात, पण खरंच असं आहे का? बर्फ लावून उघडलेले छिद्र पूर्णपणे बरे होऊ शकतात का? जाणून घेऊया त्वचा तज्ज्ञांकडून-

तज्ञ काय म्हणतात?

या प्रकरणाबाबत, प्रसिद्ध त्वचाविज्ञानी जयश्री शरद यांनी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले की, ‘बर्फाचा त्वचेची छिद्रे उघडण्यावर किंवा बंद होण्यावर परिणाम होत नाही.यामुळे तुम्हाला तात्पुरते परिणाम मिळू शकतात परंतु छिद्र उघडण्यासाठी बर्फ हा कायमस्वरूपी उपाय नाही.

ओपन पोर्सवर उपाय काय?

यासाठी त्वचाविज्ञानी AHA (अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड), BHA (बीटा हायड्रॉक्सी ॲसिड) किंवा रेटिनॉइड्स असलेले सीरम वापरण्याची शिफारस करतात.त्वचा तज्ज्ञांच्या मते, ते तुमच्या त्वचेतील कोलेजन उत्तेजित करतात, ज्यामुळे त्वचा घट्ट होते आणि त्यामुळे उघडे छिद्र कमी दिसतात.त्वचातज्ज्ञ आंचल पंथ देखील सांगतात की चेहऱ्यावर बर्फ चोळल्याने छिद्र तात्पुरते आकुंचन पावतात पण थेट उघड्या छिद्रांवर बर्फ लावल्याने देखील चेहऱ्यावर जळजळ होण्याची समस्या वाढू शकते. अशा परिस्थितीत बर्फाचा वापर टाळा.

मध – तेलकट त्वचेसाठी मध हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे . आपण मुलतानी माती, मध, गुलाबपाणी मिसळून फेसपॅक बनवू शकता. हा फेसपॅक मुरुम आणि ओपन पोर्सची समस्या कमी करण्यास मदत करतो. यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म, हायड्रोजन पेरॉक्साइड जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे त्वचेवर वाढणारे वाईट बॅक्टेरिया नाहीसे होतात.

मुलतानी माती – दोन चमचे मुलतानी माती आणि थोडे पाणी किंवा गुलाबपाणी घेऊन घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडी होईपर्यंत चेहऱ्यावर राहू द्या. हा फेसपॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. मुलतानी माती फक्त पिंपल्सच कमी करत नाही तर ओपन पोर्स कमी करण्यास देखील मदत करते.

हेही वाचा >> Khajoor milk benefits: खजूर कधी दुधात उकळून प्यायलंय का? आश्चर्यकारक फायदे एकदा वाचाच

लेखात दिलेली माहिती ही सामान्य माहिती आहेत. कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Natural home remedies for open pores does applying ice on face cure open pores know from skin experts srk