Natural Home Remedies to Get Rid of Ants : उन्हाळ्यात स्वयंपाकघरापासून प्रत्येक कानाकोपऱ्यात लाल मुंग्यांची रांग लागलेली पाहायला मिळते. किचनच्या ओट्यावर ठेवलेल्या ब्रेज, भातापासून ते किचन ट्रॉलीमधील बिस्कीटच्या डब्यांपर्यंत सगळीकडे ही रांग पसरलेली दिसते. यावेळी विविध उपाय करून या मुंग्यांना पळवलं जातं. पण, काही दिवसांनी पुन्हा त्या सगळीकडे घर करताना दिसतात. घरातील बेडपासून कपड्यांचे कपाट, गादी, उशांवरही राहून त्या त्रास देण्यास सुरुवात करतात. पण, तुम्ही खालील काही सोपे उपाय करून घरातील मुंग्यांना न मारता सहजपणे पळवून लावू शकता.

मुंग्या दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय (How to Get Rid of Ants in Your Home, Follow This 4 Tips )

१) व्हिनेगर आणि पाणी

घरात आलेल्या मुंग्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि पाण्याचा वापर करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्ही एका कंटेनरमध्ये व्हाईट व्हिनेगर आणि समान प्रमाणात पाणी घ्या. ते व्यवस्थित मिक्स करा आणि हे मिश्रण स्प्रे बाटलीत टाका. यानंतर ते मुंग्या लागलेल्या ठिकाणी स्प्रे करा. व्हिनेगरच्या वासामुळे मुंग्या सहज पळून जातील.

२) लिंबाचा रस

लिंबाचा रस वापरून तुम्ही तुमच्या घरातून मुंग्या पळवू शकता. यासाठी एक ग्लास पाण्यात एका लिंबाचा रस मिक्स करा. आता ते मुंग्यांच्या रांगेवर स्प्रे करा. लिंबाची चव आंबट असल्याने त्याच्या वासाने मुंग्या सहजपणे दूर पळून जातात.

३) लवंग आणि काळी मिरी

लवंग आणि काळी मिरी वापरून तुम्ही मुंग्यांना सहज हाकलून लावू शकता. यासाठी मुंग्या लागलेल्या ठिकाणी लवंगा किंवा काळी मिरी ठेवा. याच्या तीव्र वासामुळे मुंग्या सहज पळून जाऊ शकतात.

४) मीठ शिंपडा

मुंग्यांच्या रांगेवर मीठ शिंपडा. मुंग्यांपासून मुक्त होण्याचा हा सर्वात सोपा आणि सर्वोत्तम मार्ग आहे.