Navratri Nine Colors As Per Devi Name: गणपती बाप्पांना निरोप देऊन आता सर्वत्र नवरात्रीची तयारी सुरु झाली आहे. आश्विन शुक्ल पक्षात प्रतिपदेला देवीचे आगमन होते. घटस्थापनेच्या दिवसापासून पुढील नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तर विजयादशमीच्या मुहूर्तावर हे घट किंवा देवीच्या मूर्तीचे विसर्जन होते. यंदा १५ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या दिवसांमध्ये नवरात्री साजरी होणार आहे तर २४ ऑक्टोबरला दसऱ्याचा मुहूर्त आहे. मागील काही वर्षात नवरात्री सणाची माहिती सांगताना त्यात नऊ रंगांचा उल्लेख आवर्जून केला जातो. तुम्हीही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये रेल्वे स्टेशन, बस, ऑफिस, गरबा- दांडियाला एकाच रंगात सजून आलेले भाविक पाहिले असतीलच. या नऊ रंगांची निवड कशी होते व यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा आहे याविषयी जाणून घेऊया..

नवरात्रीचे नऊ रंग कसे ठरतात? (Navratri Nine Colors)

पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रीत विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करण्यामागे कोणतेही धार्मिक कारण नाही. तसेच याचा पाप-पुण्य, भविष्य याच्याशी काहीही संबंध नसतो. पौराणिक ग्रंथामधून प्रत्येक वाराला एक विशिष्ट रंग दिला आहे आणि त्यावरुनच नवरात्रीचे नऊ रंग ठरतात. आठवड्यात सात दिवस असल्याने जे दोन वार परत येतात, त्यादिवशी त्या रंगाचा ‘सिस्टर कलर’ म्हणजे त्याच्या जवळचा रंग त्या दिवसासाठी निवडला जातो.

Barsu oil refinery project
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा

नवरात्रीत नऊ रंगांचे कपडे का घालायचे? (Why Wear Nine Colors in Navratri)

वर म्हटल्याप्रमाणे हा मुद्दा पूर्णतः तुमच्या आवडीवर अवलंबून आहे व असा कोणताही लिखित नियम नाही. मात्र सणांच्या दिवसात एकोपा आणि आपण समाज म्हणून किती जोडलेले आहोत याला महत्त्व असतेच. आपल्या परिधानातून एकता दर्शवण्यासाठी अशाप्रकारे नऊ रंगांचे कपडे घातले जातात.

२०२३ नवरात्रीचे नऊ रंग व देवीची नावे (Navratri 2023 Dates, Colors & Devi Names)

प्रतिपदा- १५ ऑक्टोबर: नारंगी रंग (रविवार)

रविवारी केशरी रंग परिधान करून देवी नवदुर्गेची पूजा केली जाते, हा रंग सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असतो आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो.

द्वितीया- १६ ऑक्टोबर: पांढरा रंग (सोमवार)

यादिवशी शैलपुत्रीचे पूजन केले जाते. पांढरा रंग शुद्धता व पावित्र्याचे प्रतीक आहे.

तृतीया – १७ ऑक्टोबर: लाल रंग (मंगळवार)

या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. लाल हा रंग आवड, शुभसंकेत आणि ऊर्जेचे प्रतीक आहे.

चतुर्थी – १८ ऑक्टोबर : रॉयल निळा (बुधवार)

या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. निळा रंग हा विशालता, विश्वास, श्रद्धा, आत्मियया यांचे प्रतीक आहे.

पंचमी – १९ ऑक्टोबर: पिवळा (गुरुवार)

या दिवशी कृष्मांडा देवीच्या नामाचा जप केला जातो. पिवळा हा सूर्यप्रकाशाचा म्हणजेच प्रखरता, तेज व नव्या सुरुवातीचा रंग म्हणून ओळखला जातो.

षष्ठी – २० ऑक्टोबर: हिरवा रंग (शुक्रवार)

या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. हिरवा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला जातो.

सप्तमी- २१ ऑक्टोबर : राखाडी रंग (शनिवार)

या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. राखाडी रंग हा स्थिरता, अढळता आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो.

अष्टमी- २२ ऑक्टोबर : जांभळा रंग (रविवार)

या दिवशी महागौरीचे पूजन केले जाते. जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक असतो.

नवमी- २३ ऑक्टोबर : मोरपंखी रंग (सोमवार)

या दिवशी सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते. मोरपंखी रंग वाढ आणि सुपिकतेचं प्रतीक आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader