Navratri 2024 Outfit Idea : लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर वेध लागतात ते शारदीय नवरात्रीचे. यंदा शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात ३ ऑक्टोबर २०२४ पासून होणार आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्येही नवरात्रीनिमित्त खरेदीच्या वस्तू पाहायला मिळत आहेत. घटस्थापना झाल्यानंतर नऊ दिवस आदिशक्तीचा जागर केला जाईल. त्यात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाईल. त्यानिमित्त दांडिया अर्थात रास गरबा खेळण्याचीदेखील परंपरा आहे. ही विशेष गुजराती परंपरा असली तरी मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये गरब्याचे आयोजन केले जाते. गरब्यानिमित्त तरुणी खास पारंपरिक पोशाख घागरा-चोळी आणि ऑक्सिडाईज दागिने परिधान करतात. तर, तरुण पायजमा-कुर्ता परिधान करून गरबा खेळण्याचा आनंद घेतात. जर यंदा तुम्ही गरब्यासाठी स्वस्तात ट्रेंडी घागरा-चोळी आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी शोधत असाल, तर मुंबईतील सहा मार्केट्सना नक्की भेट देऊ शकता.

नवरात्रीत गरब्यानिमित्त घागरा-चोळी खरेदी करण्यासाठी मुंबईतील बेस्ट मार्केट्स

१) जांभळी गल्ली

जर तुम्हाला यंदा नवरात्रीदरम्यान खूप ट्रेंडी आउटफिट पाहिजे असतील, तर बोरिवलीतील जांभळी गल्ली एक बेस्ट ऑप्शन आहे. मोक्ष मॉलच्या बाहेर तुम्हाला अनेक फेरीवाले गरब्यासाठी एकदम ट्रेंडी फॅशनेबल कपडे विकताना दिसतात. त्यात अगदी लहान मुलांपासून, तरुण-तरुणींसाठी विविध ऑप्शन आहेत. या ठिकाणीही तुम्हाला ज्वेलरीसाठीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

ठिकाण : जांभळी गल्ली, मोक्ष मॉलसमोर, बोरिवली पश्चिम, मुंबई.

जवळचे रेल्वेस्थानक : बोरिवली.

वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ८.३०; गुरुवारी बहुधा बंद.

२) भुलेश्वर मार्केट

तुम्हाला अगदी स्वस्तात घागरा-चोळी खरेदी करायची असेल, तर भुलेश्वर मार्केट उत्तम आहे. या ठिकाणी तुम्हाला आकर्षक पॅचवर्क, आरसे, कवड्यांनी सजलेल्या ट्रेंडी घागरा-चोळीचे पॅटर्न पाहायला मिळतात. त्याशिवाय विविध प्रकारची ज्वेलरीदेखील घाऊक दरांमध्ये विकत घेता येते.

ठिकाण : भुलेश्वर मार्केट, बीएमसी मार्केट, मरीन लाईन्स ईस्ट, पांजरापोळ, भुलेश्वर, मुंबई.

आणखी वाचा

जवळचे रेल्वेस्थानक : चर्नी रोड

वेळ : सकाळी १० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत; सर्व दिवस.

३) नटराज मार्केट

मालाडमधील नटराज मार्केटमध्येही तुम्हाला नवरात्रीनिमित्त पारंपरिक गुजराती आणि राजस्थानी कपडे, साड्यांचे विविध ट्रेंड्स पाहायला मिळतील. या दिवसांत अनेक महिला खरेदीसाठी नटराज मार्केटमध्ये गर्दी करतात. तुम्हाला इथे घागरा-चोळीच्या फॅब्रिकपासून ते शिवलेल्या ट्रेंडी ब्लाऊजपर्यंत विविध गोष्टी खरेदी करता येतात. त्याशिवाय तुम्हाला ज्वेलरी खरेदीसाठी या ठिकाणीच विविध दुकाने आहेत.

ठिकाण : स्वामी विवेकानंद रोड, विजयकर वाडी इंडस्ट्रियल, विजयकर वाडी, मालाड पश्चिम, मुंबई.

जवळचे रेल्वेस्थानक : मालाड.

वेळ : सकाळी ११ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत; गुरुवारी बंद.

४) मंगलदास मार्केट

मुंबईतील सर्वांत जुने आणि चांगल्या दर्जाच्या वस्तू, कपडे विकत घेण्यासाठी मंगलदास मार्केट प्रसिद्ध आहे. अनेक किरकोळ विक्रेते या ठिकाणाहून वस्तू खरेदी करतात आणि ते विविध ठिकाणी विकतात. या ठिकाणी तुम्हाला नवरात्रीतील कपड्यांचेही विविध प्रकार पाहायला मिळतील. त्याशिवाय ज्वेलरी, मेकअप किटपासून विविध ब्युटी प्रॉडक्ट्सही खरेदी करता येतील. नवरात्रीदरम्यान इथे तुम्हाला फॅब्रिक्समध्ये लेटेस्ट ट्रेंड पाहायला मिळतात.

ठिकाण : मंगलदास मार्केट, ६६ कांतीलाल एम. शर्मा स्ट्रीट, लोहार चाळ, काळबादेवी, मुंबई.

जवळचे रेल्वेस्थानक : मरीन लाईन्स.

वेळ : सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत; रविवारी बहुतेक दुकाने बंद.

५) मंगलम मार्केट

यंदा तुम्हाला नवरात्रीसाठी फॅन्सी आउटफिट पाहिजे असतील, तर हे मार्केट चांगला पर्याय आहे. इथे अनेक दुकाने आहेत; जिथे तुम्हाला फॅन्सी घागरा-चोळी मिळू शकतात. विशेषत: तरुणींसाठी इथे हमखास पर्याय उपलब्ध आहेत.

ठिकाण : दशरथलाल जोशी रोड, स्टेशनजवळ, एलआयसी कॉलनी, सुरेश कॉलनी, विलेपार्ले पश्चिम, मुंबई.

जवळचे रेल्वेस्थानक : विलेपार्ले.

वेळ : सकाळी १० ते रात्री ८; रविवारी बंद.