Navratri Fashion Trends: नवरात्र हा भारतातील सर्वांत उत्साही सणांपैकी एक आहे; जो भक्ती आणि आनंदाची भावना निर्माण करतो. यंदा ३ ऑक्टोबर २०२४ पासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. गरबा आणि दांडिया यांसारख्या पारंपरिक नृत्यांसाठी नवरात्री प्रसिद्ध आहे; ज्यामध्ये लोक पारंपरिक पोशाख परिधान करतात. पण, आजकाल या पारंपरिक पोशाखाला एक मॉडर्न ट्विस्ट देऊन सगळ्यात हटके दिसण्यावर सगळ्यांचा भर असतो. त्यामुळे गरबा आणि दांडिया खेळायला आवडणाऱ्या प्रत्येकाला नवनवीन फॅशन ट्रेंड्स, कपडे ट्राय करण्याची उत्सुकता निर्माण झाली असेलच.
या नवरात्रीला नेमके कोणते फॅशन ट्रेंड्स तुम्ही फॉलो करू शकता, हे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
हेही वाचा… शेवटी आई ती आईच! मुलाला वाचवण्यासाठी आईने सर्वस्व पणाला लावलं, पाहा VIDEOमध्ये नेमकं काय घडलं?
१. एम्ब्रॉयडर्ड जॅकेट्स (भरतकाम केलेले)
वेस्टर्न असो किंवा इंडो-वेस्टर्न असो एम्ब्रॉयडर्ड जॅकेट्स तुमच्या आउटफिटला एक वेगळा लूक देतात. एम्ब्रॉयडर्ड जॅकेट्समध्ये तुम्ही विविध पद्धतीने स्टाईल करू शकता. मॅक्सी ड्रेस किंवा एखाद्या जंपसूटवर तुम्ही जॅकेट घालून, त्यावर ऑक्सिडाइज्ड चोकर किंवा एक लांब नेकलेस घालून, हा लूक परिपूर्ण करू शकता आणि दांडिया नाईटसाठी रेडी होऊ शकता.
२. व्हर्सेटाईल व्हाईट शर्ट
मुलींनो, एखादा व्हाईट शर्ट तुमच्या क्लोजेटमध्ये असायलाच हवा. एखाद्या स्कर्टवर, प्लाझोवर किंवा साडीवर ब्लाऊज म्हणूनदेखील तुम्ही या व्हाईट शर्टचा वापर करू शकता. गरबा किंवा दांडिया नाईटसाठी तुम्ही खासकरून एखाद्या घोळदार लेहेंग्यावर हा व्हाईट शर्ट घाला आणि त्यावर सुंदर नेकलेस, इअरिंग्स, मांग टिका, कडा या ज्वेलरी घालून, एक पारंपरिक लूक परिपूर्ण करा.
हेही वाचा… “या दोघींना पट्ट्याने मारायला हवं”, असं का म्हणतायत नेटकरी, VIDEO पाहून कळेल नेमकं कुठे चुकलं
३. धोती पॅंन्ट्स
धोती पॅन्टला हेरम पॅन्ट म्हणूनही ओळखलं जातं. ‘जब वी मेट’मध्ये करीना कपूरनं याच लूकनं सगळ्यांना घायाळ केलं होतं. जर तुमच्या कपाटात अशीच एखादी धोती पॅन्ट असेल, तर वाट कसली बघताय? लगेच हा लूक ट्राय करा. या धोती पॅन्टला मॅचिंग अशा ओव्हरसाईज्ड टॉपसह या लूकला तुम्ही पूर्ण करू शकता.
४. दुपट्टा
प्लेन बांधणी किंवा हेवी दुपट्टा अगदी सहजपणे नवरात्री लूक तयार करू शकतो. काळ्या टॉपवर एखादा व्हायब्रंट दुपट्टा खांद्यावरून घेऊन, फिरवून कमरेला खोचा आणि त्यावर एक बेल्ट किंवा कमरपट्टा लावून हा लूक तयार करू शकता. ऑक्सिडाइज्ड झुमका, नेकलेस आणि कड्यासाह हा लूक पूर्ण करा.
हेही वाचा… VIDEO: “ऐ, आधी काच खाली घे मग पुढचं बोल”, पुण्यात रिक्षाचालकाची दादागिरी; भररस्त्यात काय केलं पाहा
५. साडी
भारतीय स्त्रियांचा सगळ्यात आवडता पोशाख म्हणजे साडी. कोणताही सण-वार असो; साडीची फॅशन कधीच जुनी होऊ शकत नाही. साडी तुम्ही या खास क्षणी नेसू शकता. नऊ दिवसांसाठी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या तुम्ही वापरू शकता. हलकी सिल्क किंवा शिफॉन साडीचा पर्याय तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. साडीचा लूक पूर्ण करण्यासाठी दागिन्यांची निवडदेखील महत्त्वाची ठरते.