उपवासासाठी ‘खजूर मिल्क शेक’ हा उत्तम पर्याय ठरू शकतो. खजूरामध्ये भरपूर जीवनसत्वे असतात. उन्हाळ्यात थंडगार दुधाचा, तर हिवाळ्यात कोमट दुधाचा वापर करून ऋतूप्रमाणे तुम्ही हे पौष्टीक मिल्क शेक तयार करू शकता.

साहित्य:
२ कप दूध, १२ खजूर, ३ ते ४ काजू, २ हिरवी वेलची, तुम्हाला थंड चालत असल्यास १ कप बर्फाचे तुकडे

कृती:
खजूर चांगला साफ करून त्याचे बारीक तुकडे करा. काजूचे बारीक तुकडे करून, हिरव्या वेलचीच्या दाण्यांची पुड करून घ्या. मिक्सरमध्ये खजुराचे बारीक केलेले तुकडे आणि थोडे दूध घालून चांगले फिरवून घ्या. आता त्यात वेलची पावडर आणि उरलेले दूध घालून पुन्हा मिक्समधून फिरवा. शेवटी बर्फाचे तुकडे घालून पुन्हा एकदा मिक्समधून फिरवून घ्या. तयार झालेले खजूराचे मिल्क शेक एका ग्लासात ओतून काजूच्या तुकड्यांनी गार्निश करून सर्व्ह करा.

khajoor

टीप:
खजूर मूळात खूप गोड असल्यामुळे साखरेचा वापर न केल्यास चालेल. परंतु तुम्हाला जास्त गोड चालत असल्यास मध किंवा साखरेचा वापर करू शकता. ‘खजूर मिल्क शेक’मध्ये व्हेनिला अथवा चॉकलेट आईस्क्रिम घालूनदेखील सर्व करू शकता.
(सौजन्य निशा मधुलिका)

Story img Loader