साहित्य : हरभरा डाळ (अर्धी वाटी), मूगडाळ (पाव वाटी), मसूरडाळ  (पाव वाटी), तुरीची डाळ (पाव वाटी), उडदाची डाळ ( पाव वाटी), जिरे (एक चमचा), हिरव्या मिरच्या ( चार ), चिरलेला कढीपत्ता( दहा ते बारा पानं), तेल ( तळण्यासाठी) मीठ – चवीनुसार

कृती :  सर्व डाळी एकत्र करून चार तास भिजवून ठेवा. नंतर मिक्सरमध्ये जिरे, मिरच्या वाटून घ्या. त्यातच डाळ घालून वाटा. या मिश्रणात मीठ, कढीपत्ता घाला. छान एकत्र करा. हातावर छोटे छोटे वडे थापून तेलात तळून घ्या.* नवरात्रीत देवीच्या नैवेद्याला अंबोडय़ा करतात.

मंजिरी कपडेकर – response.lokprabha@expressindia.com

सौजन्य – लोकप्रभा

Story img Loader