आपल्यापैकी अनेकांना सकाळी उठल्यानंतर कॉफी प्यायला खूप आवडतं. शिवाय काही लोक तर कॉफी पिल्याशिवाय दिवसाची सुरुवातच करत नाहीत. परंतु तज्ञांच्या मते, कॉफीमध्ये असलेले कॅफिन शरीरासाठी नुकसानकारक ठरु शकते. डॉ. दिक्षा भावसार सावलिया यांनी त्यांच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. “जेव्हा तुम्ही आतड्याच्या किंवा हार्मोनल समस्यांनी ग्रस्त असता तेव्हा सकासकाळी पोटात जाणाऱ्या कॅफीनमुळे आधीच सूजलेल्या आतड्याची जास्त जळजळ होऊ शकते.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या पुढे सांगतात “कॅफीन तुमच्या आतड्यांना त्रास देते आणि वातसह पित्ताची समस्यादेखील वाढवते, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन, आतड्याला सूज येणे, बद्धकोष्ठता आणि उष्णता अशा समस्या उद्भवतात.” त्यामुळे अशा समस्यांपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर त्यासाठी काय करता येऊ शकतं. यासाठी त्यांनी एक आरोग्यदायी उपाय सांगितला आहे. यासाठी त्यांनी इंस्टाग्रामवर “कॅफिन-मुक्त हर्बल चहा” ची रेसिपी शेअर केली आहे.

हेही वाचा- पन्नाशीच्या आत हृदयविकाराचा झटका येण्याच्या प्रमाणात वाढ

आरोग्यपूर्ण बदलांचा समावेश करण्याचा सर्वात सोपा, जलद आणि सर्वात प्रभावी मार्ग” असं कॅप्शनदेखील त्यांनी या इंस्टाग्रावर शेअर केलेल्या रेसिपीसाठी दिलं आहे. तसंच, आम्लता, मायग्रेन, मळमळ, डोकेदुखी, जीईआरडी, पीसीओएस, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल यासांरख्या त्रासांपासून हा हर्बल चहा आराम देऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे.

हर्बल चहाची रेसिपी पुढीलप्रमाणे –

  • १ ग्लास पाणी (300 मिली) घ्या.
  • १५ कढीपत्ता पाने घाला.
  • १५ पुदिन्याची पाने घाला.
  • १ चचा बडीशेप
  • २ चमचे धणे घ्या आणि हे सर्व मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटं उकळवा, त्यानंतर ते गाळून पिऊ शकता.

तुम्हाला जेव्हा हार्मोनल आणि पित्ताच्या समस्या असतील तेव्हा कॅफीन थांबवण्याचा हा सर्वात चांगला उपाय असल्याचंही डॉ. दिक्षा भावसार सावलिया यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा- सी सेक्शन डिलीव्हरीनंतर महिलांच्या मणक्यात तीव्र वेदना का होतात? जाणून घ्या त्यामागील कारणे

त्या पुढे सांगतात, जर तुम्हाला होणारा त्रास लगेच थांबत नसेल तर तुम्ही तुमच्या चहा/कॉफीमध्ये अर्धा चमचा देसी तूप किंवा १ टीस्पून खोबरेल तेल घालू शकता ज्यामुळे तुमच्या आतड्यांना होणारा त्रास कमी होऊ शकतो. आहारतज्ञ, श्री लक्ष्मी, नारायणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बंगळुरु यांनी सांगितले की, “ग्रीन टी, कोमट लिंबू गूळ किंवा हर्बल टी यासारखे आरोग्यदायी पर्याय जोडून कॅफीनचे सेवन कमी करणे शक्य आहे. तसेच तुमची साखर कमी करण्यासाठी एकूण आहारात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थांचा समावेश करा ज्यामुळे इन्सुलिनचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. जर इन्सुलिन कमी प्रमाणात तयार झाले तर तुम्हाला उत्साही वाटण्यास मदत होऊ शकते”