कडूलिंब ही वनस्पती आपण औषधी वनस्पती म्हणून ओळखतो. कडुलिंबाची पाने रोज सकाळी चावून खाल्यास कालांतराने कोणत्याही विषाचा शरीरावर परिणाम होत नाही असे म्हणतात. कडुलिंब या झाडाचा प्रत्येक भाग कोणत्या न कोणत्यातरी आजारावर गुणकारी आहे. कडुलिंबाच्या असाधारण औषधी गुणधर्मामुळे अनेक शारीरिक आजार नाहिसे होतात. कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील कफ, उष्णता कमी होते. उत्तमपैकी अग्निप्रदीपक आणि पाचक असणारा कडुलिंब ताप, विषमज्वर, दाह, जखम, इ. अनेक रोगांवर गुणकारी आहे. जंतूनाशक म्हणून ओळखल्या जाणार्या कडुनिंबाच्या प्रथिनांचा वापर कर्करोगावर नियंत्रण आणण्यासाठी देखील होतो. कडुनिंबातील प्रथिने कर्करोगाच्या पेशीवर थेट हल्ला करत नाहीत तर शरीराला रोगप्रतिकारक क्षमता देणार्या पेशींना कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करण्यास उद्युक्त करतात. त्यामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखली जाते. कडूलिंब हे शरीरासाठी लाभदायक आहे.
कडूलिंब अथवा कडुनिंब वा बाळंतलिंब या नवावे ओळखले जाते. भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ आणि बांग्लादेश या देशात आढळणारा वृक्ष आहे. कडुलिंबाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. संस्कृतमध्ये अर्कपादक, निंबक, पारिभद्रक; मराठींत कडूनिंब, बाळंतनिंब; हिंदींत नीम; गुजराथींत लिमडूं आदी नावे आहेत.
कडुनिंबाची पाने खा, कर्करोग टाळा!
कडुलिंबाची पाने रोज सकाळी चावून खाल्यास कालांतराने कोणत्याही विषाचा शरीरावर परिणाम होत नाही असे म्हणतात.
आणखी वाचा
First published on: 17-08-2013 at 03:11 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neem eat avoid cancer