How to make neem kadha: तुम्ही कधी कडुलिंबाच्या पाण्याचा काढा प्यायला आहे का? नसेल तर एकदा तरी नक्की प्या. खरं तर कडुलिंब तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी काम करू शकतो. कडुलिंबाचा काढा तुमच्या त्वचेतील लहान छिद्रे स्वच्छ करण्यात आणि नैसर्गिक पद्धतीने निरोगी ठेवण्यास मदत करू शकतो. इतकेच नाही तर त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवर कडुलिंबाचा काढा खूप फायदेशीर आहे. या सर्व फायद्यांबद्दल आपण जाणून घेऊ, पण त्याआधी आपण कडुलिंबाचा काढा कसा बनवायचा आणि त्याची बनवण्याची पद्धत काय आहे ते जाणून घेऊया.

कडुलिंबाचा काढा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • कडुलिंबाची पाने
  • काळे मीठ
  • लिंबाचा रस
  • पाणी

कडुलिंबाचा काढा बनवण्याची पद्धत:

  • कडुलिंबाचा काढा बनवण्यासाठी कडुलिंबाची पाने धुवून नंतर उकळवा.
  • पाने उकळल्यावर पाण्याबरोबर बारीक करून घ्या.
  • यानंतर त्यात काळे मीठ आणि लिंबाचा रस घाला.
  • त्यानंतर हा कडुलिंबाचा काढा प्या.

कडुलिंबाचा काढा पिण्याचे फायदे

मुरुमांसाठी कडुलिंबाचा काढा

मुरुमांसाठी कडुलिंबाचा काढा पिणे फायदेशीर आहे. हा बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे, जे मुरुमांच्या बॅक्टेरियांना मारण्यात मदत करते. यामुळे मुरुमांची समस्या कमी होते आणि त्वचेवर नवीन मुरुम दिसत नाहीत. त्यामुळे ज्यांना या समस्येचा वारंवार सामना करावा लागतो, त्यांनी कडुलिंबाचा काढा बनवून तो पिण्यास सुरुवात करावी.

हेही वाचा: उपाशीपोटी हरभरा आणि मनुक्यांचे सेवन केल्याने होतात अनेक फायदे

खाज सुटणे आणि काळे डाग कमी करणे

चेहऱ्यावरील खाज आणि काळे डाग कमी करण्यासाठी कडुलिंबाचा काढा खूप फायदेशीर आहे. हा प्रतिजैविक क्रियांमध्ये उपयुक्त आहे, ज्यामुळे खाज सुटणे आणि चेहऱ्यावरील डाग कमी होतात. इतकेच नाही तर कडुलिंबाचा काढा प्यायल्याने रक्त शुद्ध होते आणि त्वचेचे संक्रमण कमी होऊ लागते.

Story img Loader