जे लोक नकारात्मक भावना दाबण्याचा किंवा त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न करतात त्यांना उलट ताण जास्त येतो. जे लोक नकारात्मक भावना न दाबता त्यांना सामोरे जातात त्यांना उलट फायदाच होतो, असे एका संशोधनात दिसून आले आहे. बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक आयरिस मॉस यांनी सांगितले की, जे लोक नकारात्मक भावनांचा स्वीकार करतात त्यांच्यात नकारात्मक भावना कालांतराने कमी होतात. त्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य सुधारते. भावनिक स्वीकार व मानसिक आरोग्य यांचा संबंध १३०० हून अधिक प्रौढांमध्ये तपासण्यात आला. जे लोक नकारात्मक भावना दाबण्याचा प्रयत्न करीत सामोरे जात नाहीत त्यांना ताण जास्त येतो. जे लोक दु:खद भावना, निराशा व पश्चात्ताप या भावना स्वीकारतात त्यांच्यात फार भराभर मूड पालटण्याचा रोग कमी दिसतो. कॅनडातील टोरांटो विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक ब्रेट फोर्ड यांच्या मते नकारात्मक भावनांना सामोरे जाणे ही एक कला आहे. जे लोक मूल्यमापन न करता या नकारात्मक भावना येऊ देतात, त्यांना सामोरे जातात ते ताण झेलू शकतात. वय, आर्थिक व सामाजिक स्थिती, लोकसंख्यात्मक चलांक यांच्या आधारे हे संशोधन करण्यात आल्याने ते सर्वसमावेशक आहे. जे लोक नकारात्मक भावनांचा बाऊ करीत नाहीत व त्यावर वाईट वाटून घेत नाहीत ते व्यवस्थित जीवन जगतात. ‘दी जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकॉलॉजी’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा