गेल्या काही दिवसांत मॅगी न्यूडल्सच्या वादामुळे नेस्ले कंपनीला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले होते. या सर्व प्रकारानंतर मॅगीसह नेस्लेच्या सर्वच उत्पादनांबाबत नाही म्हटले तरी भारतीय बाजारपेठेत काहीसे शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच ‘नेस्ले’च्या भारतातील शतकपूर्तीनिमित्त कंपनीने ग्राहकांच्या मनात पूर्वीचे स्थान मिळविण्यासाठी जाहिरांतीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. स्वित्झर्लंडमधील ही कंपनी गेल्या काही दशकांमध्ये कशाप्रकारे भारतीयांच्या जगण्याचा अविभाज्य झाली, याची झलक दाखविणारी ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. तब्बल ९२ सेकंदांच्या या जाहिरातीमध्ये भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून आत्तापर्यंतच्या महत्त्वपूर्ण बदलांची नेस्ले कंपनी कशाप्रकारे साक्षीदार राहिली आहे, हे भावनिकदृष्ट्या ठसविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. १९१२ साली नेस्लेने भारतात प्रवेश केला होता. त्यानंतरचा नेस्लेचा भारतातील प्रवास या व्हिडिओत दाखविण्यात आला आहे. मात्र, या व्हिडिओत नेस्लेची कॉफी, चॉकलेटस, दुग्धजन्य उत्पादनांचा समावेश असला तरी मॅगी न्यूडल्सचा समावेश टाळण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा