Cooking Tips : प्रेशर कुकर हा स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक आहे. अनेकदा प्रेशर कुकरच्या मदतीने आपण झटपट अन्न शिजवू शकतो. त्यामुळे अनेकजण प्रेशर कुकरचा भरपूर वापर करतात पण तुम्हाला माहिती आहे का प्रेशर कुकरमध्ये काय शिजवावे आणि काय शिजवू नये? आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या प्रेशर कुकरमध्ये चुकूनही शिजवू नये.
भाज्या
भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात. खनिजे, व्हिटामिन्सची मात्रा अधिक असते. जर तुम्ही भाज्या कुकरमध्ये शिजवत असाल तर त्यातील ही पोषक तत्वे नष्ट होतात. याच कारणामुळे भाज्या नेहमी कढईत बनवा.
हेही वाचा : Weight Loss : वजन कमी करण्यासाठी सब्जा फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात ….
पास्ता
प्रेशर कुकरमध्ये जर तुम्ही पास्ता बनवत असाल तर त्यातील स्टार्चची मात्रा अधिक वाढते. हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पास्ता नेहमी कढईत बनवा.
भात
अनेकदा लोक लवकर स्वयंपाक व्हावा म्हणून भात कुकरमध्ये शिजवतात पण हे चुकीचे आहे. अशी चूक करू नका. जेव्हा भात कुकरमध्ये शिजवता तेव्हा भातातील स्टार्च एक्रिलामाइड नावाचे रसायन बाहेर सोडतात जे आरोग्यासाठी चांगले नसते.
हेही वाचा : Blackheads Removal : चेहऱ्यावर सतत ब्लॅकहेड्स येतात? हे सोपे घरगुती उपाय करून पाहा; मग लवकरत मिळेल सुटका….
मासे
अनेक लोक मासे कुकरमध्ये शिजवतात. पण हे चुकीचे आहे. मासे हे लवकर शिजतात त्यामुळे जर मासे प्रेशर कुकरमध्ये शिजवले तर मासे प्रमाणाच्या बाहेर शिजू शकतात. असे केल्यामुळे अनेकदा तुमची डिश सुद्धा खराब होऊ शकते.
बटाटा
अनेक लोक बटाटा प्रेशर कुकरमध्ये उकळतात पण ही चूक तुम्ही कधीही करू नका. भाताप्रमाणे बटाट्यामध्ये स्टार्च असते. यामुळे बटाट्याला प्रेशर कुकरमध्ये शिजवणे आरोग्यासाठी चांगले नाही.