Chanakya Niti in Marathi : महान अर्थशास्त्रज्ञ आणि रणनीतिकार आचार्य चाणक्य हे त्यांच्या धोरणांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. आपल्या धोरणांच्या जोरावर चाणक्यांनी एका साध्या मुलाला चंद्रगुप्त मौर्याला मगधचा सम्राट बनवलं. आचार्य चाणक्यांनी आपल्या धोरणांतून नेहमीच समाजाचं कल्याण केलं आहे. त्यांनी एक नीतिशास्त्रही रचलं होतं, ज्यामध्ये संपत्ती, कुटुंब, नातेसंबंध, विवाहित जीवन, मुले, मित्र आणि शत्रू अशा सर्व विषयांवर सूचना देण्यात आल्या आहेत.
आचार्य चाणक्यजींनी आपल्या नीतिशास्त्रात अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या व्यक्तीने आपल्या मुलांसमोर आणि पत्नीसमोर कधीही करू नयेत. चाणक्यजींच्या मते, शब्दांचा मार सर्वात जास्त वेदना देत असतो. त्यामुळे पत्नी आणि मुलांसमोर शब्दांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी. आचार्य चाणक्यजींनी सांगितलं आहे की पत्नी आणि मुलांसमोर चुकूनही या गोष्टी करू नयेत-
चुकीची वागणूक: आचार्य चाणक्य यांच्या मते, मोठ्यांच्या भाषेचा आणि बोलीचा मुलांवर सर्वाधिक प्रभाव पडतो. त्यामुळे पालकांनी मुलांसमोर संवाद साधताना अधिक काळजी घेतली पाहिजे. त्यांनी कधीही चुकीची आणि अयोग्य भाषा वापरू नये. कारण अशा गोष्टींचा परिणाम मुलांच्या आयुष्यावर होऊ शकतो.
आणखी वाचा : Chanakya Niti: या सवयींमुळे माणूस दरिद्री होतो, लक्ष्मीही त्याची साथ सोडते
मनाला लागणाऱ्या गोष्टी: आचार्य चाणक्यजी सांगतात की, पत्नीसमोर अशा गोष्टी कधीही करू नका, ज्यामुळे तिचे मन दुखेल. कारण बायकोसमोर मनाला लागणाऱ्या गोष्टी केल्याने तिचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्यामुळे घरात कलह निर्माण होतो. त्यामुळे तुमचे नाते तणावमुक्त ठेवण्यासाठी पत्नीशी नेहमी प्रेमाने बोला.
आणखी वाचा : १६ डिसेंबरला सूर्य धनु राशीत प्रवेश करत आहे, या ४ राशींना होईल धनलाभ
अनुशासनहीनता: आचार्य चाणक्यजी मानतात की, जर तुम्हाला तुमच्या घरात नेहमी आनंदी वातावरण हवं असेल, तर शिस्त अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय कुटुंबाशी नम्रतेने बोलले पाहिजे आणि रागापासून दूर राहावे. यामुळे घरात सुख-समृद्धी राहते.