फळे हा आपल्या निरोगी आहाराचा अविभाज्य घटक आहे. फळांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. फळातून आपल्या शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. प्रत्येक फळाचा एक वेगळा गोडवा असतो. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळे फळ आवडू शकते.
तुमचे आवडते फळ कोणते? कारण काही फळे खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये, असे म्हणतात. याविषयी डॉ. विनोद शर्मा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओतून सांगतात की, अशी पाच फळे आहेत; जी खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंबट फळे

आंबट फळे जसे संत्री, आवळा, द्राक्षे खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नका. त्यामुळे तुमच्या शरीरातील पीएच (PH) पातळी बिघडू शकते.

हेही वाचा : नवऱ्यांनो, ‘या’ चुकांमुळे तुम्ही कधीही चांगला नवरा होऊ शकत नाही! आजपासून सोडा या वाईट सवयी …

टरबूज

टरबूज या फळामध्ये आधीच पाण्याची मात्रा अधिक असते. डॉक्टरांच्या मते, टरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. असे केल्यामुळे पचनक्रिया बिघडू शकते.

पेरू

आंबट-गोड चवीचे पेरू अनेकांना आवडतात. पेरूमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए व सीशिवाय फॉलिक ॲसिड, पोटॅशियम व कॉपरचा चांगला स्रोत असतो. हे फळ खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका; नाही तर पचनक्रिया बिघडू शकते.

डाळिंब

डाळिंब हे असं फळ आहे; जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतं. गोड असलेलं हे फळ शरीरातील रक्त वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे; पण डाळिंब खाल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये. कारण- त्यामुळे ॲसिडिटी किंवा मळमळ जाणवू शकते.

हेही वाचा : Weight Gain and Cashews : काजू खाल्ल्यामुळे वजन वाढते का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात …

केळी

बाराही महिने उपलब्ध असलेले फळ म्हणजे केळी. केळी हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. त्यामध्ये पोटॅशियमची मात्रा चांगली असते. केळी खाल्ल्यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात; पण केळी खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका. नाही तर तुमची पचनक्रिया बिघडू शकते.

टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Never drink water after eating these fruits banana pomegranate watermelon guava and sour fruits ndj