निरोगी राहण्यासाठी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. फळांमध्ये सर्व प्रकारची पोषक तत्वे आढळतात. त्यामध्ये जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट, खनिजे, अँटी-ऑक्सिडंट्स यांसारखे घटक असतात, जे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. पण तुम्हाला माहितीये का? की, पण फळं खाल्ल्यानंतर आपण पाणी पिऊ शकतो का? असे अनेक लोक आहेत जे फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पितात. तुम्हीही असे करत असाल तर आजपासूनच हे थांबवा कारण ते आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते.

फळामध्ये जीवनसत्त्वे आणि लोह मुबलक प्रमाणात असते. जर ते योग्य प्रकारे खाल्ले तर ते शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. पण फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटाची पीएच पातळी खराब होऊ शकते. तसेच पोटात आम्लपित्त, अपचन यासारख्या समस्या सुरू होऊ शकतात.फळांमध्ये नैसर्गिक साखर आढळते. जी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. पण फळ खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

फळं खाल्ल्यावर कधी पाणी प्यावं?

फळे खाल्ल्यानंतर एक तास आधी किंवा एक तासानंतर पाणी प्यावे. जसे अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडते, त्याचप्रमाणे फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटाचा त्रास होतो. जर तुम्ही टरबूज, पपई, संत्री, अननस यांसारखी फळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायले तर तुमचे पोट खराब होऊ शकते. त्यामुळे फळे खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नका.

कोणती फळे खाल्ल्यानंतर पिऊ नये पाणी ?

केळी : तज्ज्ञांच्या मते, केळी खाल्ल्यानंतर पाणी पिणे अयोग्य आहे. केळी खाल्ल्यानंतर पाणी, विशेषतः थंड पाणी पिल्याने अपचन होऊ शकते. याला इनडाइजेशन असेही म्हटले जाते. वास्तविक, केळी आणि थंड पाण्यातील गुणधर्म सारखेच असतात. ते एकाचवेळी शरीरात गेल्याने अपचनाची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे केळी खाल्ल्यानंतर किमान १५ ते २० मिनिटांनीच पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

पेरू : अनेकदा पेरू खाल्ल्यानंतर खूप तहान लागते आणि त्यामुळे अनेकजण गटागटा पाणी पितात. परंतु असे करणे हानिकारक ठरू शकते. यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते.

काकडी आणि टरबूज : काकडी आणि टरबूज ही फळे पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयुक्त अशी ओळखली जातात, परंतु जर तुम्ही काकडी आणि टरबूजचे सेवन केल्यानंतर लगेचच भरपूर पाणी प्यायले तर, पोट खराब होऊन लूज मोशनची समस्या जाणवू शकते.

हेही वाचा >> खेळताना रंग बाई होळीचा…चेहरा, केस, त्वचा आणि कपड्यांमधून होळीचा रंग कसा काढायचा?

संत्री, अननस आणि द्राक्षे : सायट्रिक ऍसिड असलेली फळांमध्ये आधीपासूनच पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे संत्री, अननस आणि द्राक्षांसारखी पाणीदार फळं खाल्यानंतर पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील पीएच पातळी बिघडू शकते. यामुळे अपचन सारखी समस्या उद्भवू शकते.

Story img Loader