Kitchen Jugaad : चहा हा आपल्या दररोजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी दिवसाची सुरुवात आपण चहाच्या सेवनाने करतो. काही लोक तर दिवसभरातून दोन तीन वेळा घेतात. तुम्ही चहा बनवल्यानंतर गाळण्यातील चहापत्ती फेकू देता का? जर हो तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण चहा बनवल्यानंतर गाळण्यातील चहापत्तीचा कसा उपयोग करायचा, याविषयी जाणून घेणार आहोत. (never throw away used chaipatti or tea leaves after making chai)

अनेकदा घरी चहा बनवल्यानंतर चहापत्ती तशीच शिल्लक असते. मग या चहापत्तीचा काहीही उपयोग होणार नाही, हा विचार करून आपण चहापत्ती फेकून देतो पण असे करू नका. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या चहापत्तीचा कसा उपयोग करायचा याविषयी सांगितले आहे. ही ट्रिक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

Tomato soup in winter is good for health Tomato soup recipe in marathi
हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Korean Maggie Recipe
एक मॅगीचं पॅकेट आणा आणि झटपट बनवा कोरिअन स्टाईल मॅगी, वाचा ‘ही’ सोपी रेसिपी
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी

या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे –

सुरूवातीला चहाचा गाळ पाण्याने धुवून घ्यायचा आणि पाणी टाकून द्यायचे.
त्यानंतर ही चहापत्ती काचेच्या भांड्यावर घासायची. या चहापत्तीने काचेच्या भांड्यावरील सर्व डाग निघून जातात. एवढचं काय तर आरसा पुसायला सुद्धा तुम्ही ही चहापत्ती वापरू शकतात.
याशिवाय जिथे लिंबाचे, किंवा इतर कोणतेही डाग पडले असेल त्याठिकाणी ही चहापत्ती घासा, डाग झटक्यात निघून जाईल.
ही ट्रिक पाहून तु्म्हीही थक्क व्हाल. आजवर जो कोणी चहाचा गाळ फेकून द्यायचे, ते हा व्हिडीओ पाहून चहाच्या गाळाचा योग्य उपयोग करतील.

हेही वाचा : दररोज किती प्रमाणात फायबरयुक्त आहार घ्यावा? जाणून घ्या, फायबरच्या अतिसेवनाने कोणते दुष्परिणाम होतात?

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : स्क्रीनकडे बघून डोळे सतत कोरडे होतात? फक्त ‘हा’ एक व्यायाम करा, ‘ड्राय आय सिंड्रोम’ची समस्या झटक्यात दूर; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

dams_kitchen_damyanti या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बहुउपयोगी चहाचा गाळ त्याचा वापर कसा करायचा ते पहा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना हा व्हिडीओ आणि ही ट्रिक खूप आवडली आहे. एका युजरने लिहिलेय, ” चांगला उपाय आहे टाकाऊ पासून काहीतरी चांगलं होत आहे” तर एका युजरने लिहिलेय, “पैसा वाचविण्याची निंजा टेक्निक” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान ट्रिक आहे”

Story img Loader